Anganwadi Centers Approval : “प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान” अंतर्गत महाराष्ट्रातील विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचे वास्तव्य असलेल्या ७५ ठिकाणी नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
यापूर्वीही केंद्र सरकारने अशा ७० ठिकाणी अंगणवाड्यांना मंजुरी दिलेली आहे. यामध्ये राज्यातील १० जिल्ह्यात नवीन अंगणवाडी केंद्र नवीन सुरू करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार महराष्ट्रातील गडचिरोली २५, नांदेड १, नाशिक १२, पालघर १५, पुणे ११, रायगड ५५, रत्नागिरी १०, सातारा २, ठाणे ५, यवतमाळ ९ याप्रमाणे जिल्हानिहाय नवीन अंगणवाडी केंद्र (Anganwadi Centers Approval) मंजूर करण्यात आले आहेत.
राज्यातील अंगणवाडी केंद्रांना ‘या’ दराने निधी मंजूर, शासन निर्णय जारी
महत्वाचा निर्णय : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ‘विमा’ योजना लागू, अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका पदावर नियुक्ती
महाराष्ट्रातील कुपोषण मुक्तीच्या दिशेने हे अत्यंत आश्वासक पाऊल असून, याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केंद्र सरकारचे मनापासून आभार मानले आहे.