Heavy Rains School Holiday : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश दिले आहे. त्यानुसार राज्यातील काही जिल्ह्यात सोमवार दि. 22 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार नागपुर जिल्ह्यात दिनांक २१ जुलै २०२४ रोजी अंरिंज अलर्ट (Orange alert) देण्यात आलेला आहे.
नागपुर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. नागपूर जिल्हयातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे.
नागपुर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये व कोचिंग क्लासेस यांना सुट्टी जाहीर
नागपुर जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये व कोचिंग क्लासेस यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण नागपुर जिल्हा सीमा क्षेत्रामध्ये (नागपुर महानगरपालिका क्षेत्रा सह) दिनांक 22 जुलै, 2024, सोमवार रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
उच्च शिक्षणासाठी फी माफ दोन महत्वाचे शासन परिपत्रक पाहा
नागपूर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी, सुरु असलेला पाऊस लक्षात घेवून दिनांक 22 जुलै रोजी शाळा व महाविद्यालयांना जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात या भागात शाळांना सुट्टी जाहीर
राज्यातील कोकण आणि मुंबईसह विदर्भात मुसळधार पाऊस असून, या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत या तालुक्यातील शाळांना देखील सोमवार दि. 22 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आरटीई 25% प्रवेश संदर्भात महत्वाची सूचना पाहा
‘लाडका भाऊ योजना’: तरुणांना दरमहा पैसे देणारी ही योजना नेमकी काय आहे – जाणून घ्या सविस्तर
