7th Pay Commission : राज्यातील सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 50 टक्के प्रमाणे वाढ करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून थकबाकीसह Dearness Allowance ची रक्कम देण्यात येणार आहे, तसेच सातव्या वेतन आयोगाचा पाचव्या हप्त्याचा लाभ देखील मिळणार आहे.
दिनांक 1 जानेवारी 2024 पासून थकबाकीसह DA लाभ मिळणार
राज्यातील महागाई भत्याच्या वाढीचा निर्णय हा सातवा वेतन आयोग लागू असणारे कर्मचारी, असुधारित वेतन संरचनेत पाचवा आणि सहावा वेतन आयोग लागू असणारे कर्मचारी तसेच असुधारित वेतनश्रेणीत सहावा आणि पाचवा वेतन आयोगानुसार वेतन घेणारे सेवानिवृत्त कर्मचारी यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.
सदर थकबाकीसह DA ची रक्कम ही जुलै महिन्याच्या वेतनासोबत देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट मध्ये होणाऱ्या जुलै 2024 च्या वेतनासोबत थकबाकीसह DA चा लाभ मिळणार आहे.
गुड न्यूज! जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात ग्राम विकास विभागाचे परिपत्रक जारी
सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याचा लाभ मिळणार
मा. आयुक्त, शिक्षण कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे माहे जूलै 2024 चे वेतन सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) पाचव्या हप्त्यासह अदा करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहे.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, शासन आदेश जारी
तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांनाही सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात येणार आहे. याबाबत वेतन पथक, माध्यमिक कार्यालयाकडून मागणी करण्यात आली आहे. याकरीता सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी शालार्थमध्ये तात्काळ आवश्यक तो टॅब उपलब्ध करून देण्याची मागणी शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई यांच्याकडे करण्यात आली आहे.
त्यामुळे जुलै 2024 या महिन्याच्या वेतनासोबत सातव्या वेतन आयोगाचा (7th Pay Commission) पाचव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
8 वा वेतन आयोग आल्याने पगारात मोठी वाढ होणार, एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार