महत्वाचा निर्णय! या सरकारी योजनेतील डिसेंबर व जानेवारी महिन्याचे पैसे मंजूर, थेट DBT द्वारे बँक खात्यात जमा होणार, Beneficiary Direct Benefit Transfer

Beneficiary Direct Benefit Transfer : राज्यातील विविध सरकारी योजनेच्या २७ लाख १५ हजार ७९१ लाभार्थ्यांना डिसेंबर, २०२४ या महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता रु.४०८.१३ कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Government scheme : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT (Direct Benefit Transfer) Portal द्वारे करण्याबाबत, माहे, डिसेंबर, २०२४ पासून सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT (Direct Benefit Transfer) Portal मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजनेचे पैसे या तारखेला जमा होणार, तारीख व यादीत नाव पाहा

क्षेत्रिय स्तरावरुन दिनांक १९.१२.२०२४ पर्यंत DBT पोर्टलवर On Board झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २७,१५,७९६ इतकी आहे. त्यानुषंगाने DBT पोर्टलवर On Board (Aadhar Validate झालेल्या + Aadhar Validate न झालेल्या) लाभार्थ्यांना माहे डिसेंबर, २०२४ व जानेवारी, २०२५ चे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

तसेच On Board नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पध्दतीने (बिम्स प्रणालीद्वारे) अर्थसहाय्य वितरीत करण्यात येणार आहे. सदर बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी, २०२५ अखेरपर्यंतच उपलब्ध असेल.

लाडकी बहीण योजनेची ऑफलाईन आणि ऑनलाईन यादी येथे पाहा

दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी DBT पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युध्दपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे Aadhar अद्ययावत करण्यासाठी तालुका / मंडळस्तरावर विशेष मोहिम राबविण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना यापुर्वी सूचना देण्यात आलेल्या आहेत.

लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा येथे पाहा

दिनांक १९.१२.२०२४ पर्यंत On Board झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या १२,३६,४२५ इतकी आहे. तर श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या १४,७९,३६६ इतकी असून अशा एकूण २७.१५.७९१ लाभार्थ्यांना डिसेंबर, २०२४ या महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता रु.४०८.१३ कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे सदरहू योजनांकरीता स्टेट बैंक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

शासन निर्णय येथे पाहा

स्टेट बँक ऑफ इंडियात लिपिक पदांची महा भरती, जाहिरात ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

Leave a Comment