‘लाडका भाऊ योजना’: तरुणांना दरमहा पैसे देणारी ही योजना नेमकी काय आहे, अर्ज कुठे करणार, आवश्यक कागदपत्रे कोणती? जाणून घ्या..

Ladka Bhau Yojana : राज्य शासनाने लाडकी बहीण योजना राज्यात सुरू केल्यानंतर आता लाडक्या भावासाठी देखील रोजगार मिळवून देणारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, काय आहे ही योजना सविस्तर जाणून घेऊया..

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु

राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध आहेत. तथापि, असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणाऱ्या दुव्यांच्या अभावामुळे युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळण्यात अडचणी येतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे लक्षात घेऊन राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी लाडक्या भावासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ (Ladka Bhau Yojana) सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे.

मोठी अपडेट! राज्यात 14 हजार 690 रिक्त पदांसाठी अंगणवाडी भरती

Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासनामार्फत १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, आयटीआय, पदविकाधारक विद्यार्थ्यांना ८ हजार तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी पद्धतीने देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरीता आवश्यक पात्रता व मिळणारे विद्यावेतन

  1. उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.
  2. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास / आयटीआय / पदविका/ पदवी/ पदव्युत्तर असावी. (मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.)
  3. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  4. उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
  5. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
  6. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana

लाडक्या बहिणीला या दिवशी मिळणार लाभ

अशी आहे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबवली जाणार आहे. या उपक्रमांर्तगत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत.

सरकारी भरती ‘आता’ MPSC मार्फत – शासन निर्णय पाहा

ऑनलाईन नोंदणी येथे करता येणार

रोजगार इच्छुक उमेदवारांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर १२ वी, ITI, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

या योजनेकरिता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून येणार असून यात उमेदवारांची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इ. बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक सुविधा आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांच्यामार्फत निर्माण करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शासन निर्णय येथे पाहा

अधिक माहितीसाठी : https://rojgar.mahaswayam.gov.in

Leave a Comment