NUHM Recruitment : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत ठाणे महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडील विविध संवर्गातील 42 रिक्त पदे 11 महिने 29 दिवस कलावधीसाठी कंत्राटी स्वरुपात व करार पध्दतीने एकत्रित मानधनावर भरणेकामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागिवण्यात येत आहे.
त्याकरीता पात्र व इच्छुक उमेदवारांहून त्यांचे अर्ज विहित नमुन्यात ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प)-४००६०२ येथे दि.०४/१२/२०२४ ते १७/१२ /२०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे कळविण्यात आले आहे.
NUHM Recruitment
- एकुण जागा : 42
- पदाचे नाव : वैद्यकिय अधिकारी (Medical Officer) MBBS, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, प्रोग्राम असिस्टंट – QA
- पगार : 18000 ते 60000 रुपये
- आवश्यक वयोमर्यादा : अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच दि.१२/१२/२०२४ रोजी उमेदवाराचे वय जाहिरातीत विहित केलेल्या वयोमर्यादित असणे आवश्यक आहे.
ठाणे महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभाग राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात http://www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान जाहिरात पाहा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील (NHM) या कर्मचाऱ्यांचे शासन सेवेतील समायोजनाचे नियुक्ती आदेश निर्गमित
ग्रामीण डाक सेवक भरतीची तिसरी यादी जाहीर, 1154 उमेदवारांची निवड, यादीत नाव पाहा
अर्ज भरण्या बाबतच्या सूचना
- सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंक वर ऑनलाईन गुगल फॉर्म मध्येच अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
- अर्ज भरण्यासाठी गुगल फॉर्म लिंक – https://forms.gle//p९C२६&Wypxf१७JwyS९
- उमेदवाराने स्वतः पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे.
- अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
- माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाण पत्रामध्ये नमूद जन्म तारीखच अर्जात नमूद करावी.
- जाहिरात प्रसिध्द केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय (दिवस, महिने व वर्ष) अचूक नमुद करावे.
- अर्जात उमेदवाराचे लिंग या बाबतची माहिती नमूद करावी.
- अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास
- राजपत्र (Gazette) अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे.
- अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्याची माहिती अचूक भरावी, एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- गुगल फॉर्म परीपूर्ण भरल्यावर त्याची प्रिंट काढावी,
- पूर्ण भरलेल्या गूगल फॉमची स्वसाक्षांकित प्रत व (ट) मधील मुद्दा क्र. ७ नुसार सर्व कागदपत्रे ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)- ४००६०२ येथे (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) प्रत्यक्षात (By Hand) व कुरीअरने सादर करण्यात यावेत. दिलेल्या मुदतीनंतर सादर करण्यात येणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. टपालाने / कुरीयरने सादर करण्यात आलेले अर्ज विहीत कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी. उशीरा प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्जदाराने प्रत्यक्ष भरलेल्या गुगलफॉर्मची प्रत या कार्यालयास प्राप्त न झाल्यास असा अर्ज अपूर्ण समजण्यात येऊन तो रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध (7) संवर्गाचा निकाल जाहीर
800 पदांसाठी मोठी सरळसेवा भरती!जाहिरात, ऑनलाईन अर्ज – डायरेक्ट लिंक
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील (NHM) या कर्मचाऱ्यांचे शासन सेवेतील समायोजनाचे नियुक्ती आदेश निर्गमित