Employees Adjustment : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील पुरवठा आयुक्त कार्यालय, मुंबई या कार्यालयातील कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, सेवाजेष्ठता, बिंदू नामावली तसेच वेतनश्रेणी संदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार खालील निर्णय घेण्यात आला आहे.
- वित्त विभाग शासन निर्णय दि.२ जून २०१५ नुसार प्रशासकीय विभागाला प्रशासनावर कोणताही विपरित परिणाम न होता, विभागामध्ये उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचे संपूर्ण अधिकार राहतील.
- विभागाच्या ज्या संवर्गाच्या बाबतीत कामांची आवश्यकता कमी झाली आहे, अशा संवर्गातील पदांची विभागातील तीच वेतनश्रेणी असलेल्या दुसऱ्या संवर्गात आवश्यकतेनुसार पदे स्थानांतरण करता येतील. तथापि विभागांतर्गत एकूण पद संख्येच्या मर्यादेतच असे समायोजन राहील.
वित्त विभागाच्या दि.०२.०६.२०१५ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुद व खालील सेवाविषयक बाबी विचारात घेऊन, विभागाच्या अधिनस्त पुरवठा आयुक्त कार्यालय, मुंबई कार्यालयातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे समायोजन विभागाच्या अधिनस्त कार्यालयांमध्ये शासन निर्णयात सोबत जोडलेल्या विवरणपत्र “अ” मध्ये दर्शविल्याप्रमाणे करण्यात येत आहे. असे शासन निर्णयात नमूद आहे.
सेवाजेष्ठता, बिंदू नामावली तसेच वेतनश्रेणी संदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना पाहा
दिनांक 6 डिसेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर, परिपत्रक पाहा
महाराष्ट्राच्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा – Live डायरेक्ट Link
विभागाच्या अधिनस्त कार्यालयांचा उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेल्या मान्यतेनुसार सुधारित आकृतीबंधाचा शासन निर्णय यापूर्वी दि.१८.०४.२०२२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुषंगाने पुरवठा आयुक्त कार्यालय, मुंबई या कार्यालयातील सद्यस्थितीत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे विभागाच्या अधिनस्त कार्यालयांमध्ये समायोजन (Employees Adjustment) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुरवठा आयुक्त कार्यालय, मुंबई या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई, वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय, मुंबई, राज्य अन्न आयोग, मुंबई व विभागीय/जिल्हा पुरवठा कार्यालय या विभागाच्या अधिनस्त कार्यालयांमधील सरळसेवा किंवा पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा – Live डायरेक्ट Link