12 Lakh Income Tax Calculator : नोकरदारांसाठी 12 लाख रुपये उत्पन्न करमुक्त! इन्कम टॅक्स नवीन स्लॅब जाणून घ्या

12 Lakh Income Tax Calculator : केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये मध्यमवर्गासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. नव्या कररचनेत 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी करपात्र उत्पन्नाच्या स्तरात आमूलाग्र बदल आणि करदात्यांना लाभ देणारे दर सुचवले.

Tax calculator – Budget 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण वार्षिक उत्पन्नातून 75000 वजा करून उरलेली रक्कम टाका व आपला टॅक्स किती बसेल जुना आणि नवा दोन्ही पद्धतीने तपासा.

तुम्हाला किती टॅक्स बसेल? येथे चेक करा

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

  • 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त: नव्या कररचनेत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर लागू होणार नाही.
  • नोकरदारांसाठी 12.75 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त: नोकरदार करदात्यांसाठी 75,000 रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन असल्यामुळे 12.75 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल.
  • कराच्या दरात बदल: नव्या कररचनेत करआकारणीच्या दरात बदल करण्यात आले आहेत.
  • मध्यमवर्गाला लाभ: या बदलांमुळे मध्यमवर्गीयांवरील कराचा भार कमी होईल आणि त्यांच्या हाती अधिक पैसे राहतील.

नव्या कररचनेत अर्थमंत्र्यांनी कर आकारणीच्या दरातील संरचनेत खालीलप्रमाणे बदल सुचवले आहेत. करपात्र स्तरातील बदलांचे करविषयक लाभ आणि विविध उत्पन्न स्तरावरील सवलत खालील तक्त्यात दर्शवली आहे.

BMC मध्ये डॉक्टर आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी मोठी भरती!

तुम्हाला किती टॅक्स बसेल? येथे चेक करा

आरोग्य विभागाच्या बैठकीतील ठळक मुद्दे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2025-26 सादर करताना कर सुधारणांच्या महत्त्वावर जोर दिला. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कर सुधारणा आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले. नवे प्राप्तिकर विधेयक न्यायावर आधारित असेल आणि करदात्यांना ते समजायला सोपे जाईल, ज्यामुळे करनिश्चिती होईल आणि वाद कमी होतील, असेही त्यांनी नमूद केले.

केंद्रीय अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

“आधी विश्वास ठेवा, मग छाननी करा” या सरकारच्या तत्वज्ञानाशी असलेल्या बांधिलकीची पुष्टी करत केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 ने मध्यमवर्गावर विश्वास दाखवला आहे आणि सर्वसामान्य करदात्यांना कराच्या बोज्यापासून दिलासा देण्याचा कल कायम ठेवला आहे.

थिरुक्कुलमधील 542 व्या श्लोकाचा उल्लेख करत अर्थमंत्र्यांनी उत्तम प्रशासनाचे महत्त्व सांगितले. ज्याप्रमाणे सजीव पावसाची अपेक्षा करतात, त्याचप्रमाणे नागरिक चांगल्या प्रशासनाची अपेक्षा करतात, असे त्या म्हणाल्या. सुधारणा हे जनता आणि अर्थव्यवस्थेसाठी सुशासन स्थापित करण्याचे साधन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार जनतेच्या प्रश्नांना कसे समजून घेते आणि त्यांचे निराकरण करते, हे या कर प्रस्तावातून दिसून येते, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment