महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर

Voting Percentage In Maharashtra 2024 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या २८८ मतदारसंघांकरीता दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरूष, ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिला तर १ हजार ८२० इतर मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

या निवडणुकीत झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित झाली आहे. यात प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचा समावेश आहे. प्रत्यक्ष मतमोजणी करतांना टपाली मतदानाचा समावेश करण्यात येईल. त्याचप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षाद्यारे भरण्यात आलेला १७ सी हा प्रत्यक्ष झालेल्या मतदानासंदर्भातील फॉर्म उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही देण्यात आला असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे

  • करवीरमध्ये सर्वाधिक, कुलाबामध्ये सर्वात कमी मतदान
  • राज्यातील एकूण मतदानाची टक्केवारी : ६६.०५%.
  • सर्वाधिक मतदान : करवीर येथे ८४.९६%.
  • सर्वात कमी मतदान : कुलाबा येथे ४४.४४%.
  • एकूण प्रत्यक्ष मतदान : ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी सहभाग घेतला.
  • टपाली मतदानः प्रत्यक्ष मतमोजणीत याचा समावेश केला जाणार.
  • पुरुष मतदारांचे मतदान : ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७.
  • महिला मतदारांचे मतदान : ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८.
  • इतर मतदान : १ हजार ८२०.

मतदानाची अंतिम आकडेवारी – मतदारसंघ निहाय पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मतमोजणी नेमकी कशी केली जाते? जाणून घ्या

विधानसभा निवडणूक निकाल सर्वात आधी, सर्वात वेगवान निकाल ‘LIVE’ येथे पाहा

Leave a Comment