जाहिरात क्र. ०६/२०२३ करीताचे शुध्दीपत्रक
VIDYUT SAHAYAK : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळसेवा भरती अंतर्गत विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) पदांकरीता 5386 जागांसाठी मेगा भरती करण्यात येत आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जवळ आली असून, या भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.
Table of Contents
सदर जाहिरात दि. २९/१२/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्दी देण्यात आलेली होती. ऑनलाईन अर्ज सादर करणेकरीताची वाढीव मुदतवाढ दि. १६/०८/२०२४ अशी होती.
कंत्राटी कामगारांना कमाल वयोमर्यादेमध्ये वाढ करण्याचा निर्णय
जाहिरातीमध्ये कमाल वयोमर्यादा नमूद करण्यात आली आहे. महावितरण कंपनीमध्ये कंत्राटदारांमार्फत कार्यरत / काम केलेल्या बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना कमाल वयोमर्यादेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार आता महावितरण कंपनीमध्ये कंत्राटदारांमार्फत कार्यरत, काम केलेल्या कंत्राटी कामगारांकरीता कमाल वयोमर्यादा सरसकट (Cummulative age) ४३ वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन, आदेश निर्गमित
वरीलप्रमाणे जे उमेदवार वयोधीकामुळे “विद्युत सहाय्यक” (VIDYUT SAHAYAK) या पदाकरीता अर्ज करू शकले नाहीत, त्यांचेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणेकरीताची वेबलिंक (URL Link) कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दि. ०७/०१/२०२५ पर्यंत सादर करावेत. तदनंतर, अर्ज सादर करणेकरीता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
स्टेट बँक ऑफ इंडियात 13735 रिक्त पदांची मोठी भरती, जाहिरात ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
उक्त पदाची मूळ जाहिरात तसेच त्यानुषंगाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या शुध्दिपत्रकातील / प्रसिध्दीपत्रकातील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध
ऑनलाईन अर्ज , मूळ जाहिरात PDF डायरेक्ट लिंक
विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) | जाहिरात क्र. ०६/२०२३ करीताचे शुध्दीपत्रक |
विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) | सुधारित जाहिरात |
विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) | मूळ जाहिरात |
ऑनलाईन अर्ज | https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/ |
अधिकृत वेबसाईट | https://www.mahadiscom.in/ |
