Teacher Recruitment : नुकत्याच झालेल्या शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून सामावून घेण्यासंदर्भात बैठक पार पडली.
‘शिक्षणसेवक’ म्हणुन सामावून घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा
दिनांक 23 जुलै रोजी शिक्षणमंत्री यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सिंधुदूर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणुन सामावून घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे मा. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी X वर ट्वीट करत माहिती दिली आहे.
राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासाठी – राज्य शासनाचा निर्णय
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्त असलेल्या शिक्षक भरतीत (Teacher Recruitment) स्थानिक D.Ed. पदविकाधारक बेरोजगार उमेदवारांना सरसकट शिक्षण सेवक म्हणून सामावून घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी D.Ed. बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्यातील ‘या’ योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अपडेट
जिल्ह्यात 2010 पासून शेकडो उमेदवार D.Ed. पदविका घेऊन बेरोजगार आहेत. पूर्वी कोकण निवड मंडळामार्फत विभागवार भरती व्हायची, त्यामुळे स्थानिकांना संधी मिळत असे; परंतु ते रद्द झाल्यामुळे स्थानिकांवर अन्याय होऊ लागला आहे. गेली 10 वर्षे संघर्ष समितीच्यावतीने सातत्याने बेरोजगारांना न्याय मिळावा, यासाठी संघर्ष केला जात आहे.
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांसाठी सरकारने कोणता निर्णय घेतला येथे पाहा
परजिल्ह्यतील उमेदवार (शिक्षक) नोकरीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात आणि तीन वर्षे झाली की सोईनुसार आपल्या जिल्ह्यात परत बदली करून जातात. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा शिक्षकाविना ओस पडतात. यामुळे विद्यार्थ्यांचेही नुकसान होते. 2023 मध्ये यामुळेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले. शिक्षक नसल्याने शाळांची पटसंख्या कमी होऊन अनेक शाळा बंद कराव्या लागल्या. त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करून स्थानिक उमेदवारांच्या भरतीला प्राधान्य देण्याची गरज आहे. – सहदेव पाटकर, सचिव, डी.एड्. बेरोजगार संघर्ष समिती, सिंधुदुर्ग
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील करमचाऱ्यांसाठी मोठी अपडेट
कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 हजार रुपयांची मोठी वाढ – शासन निर्णय