ST Employee Benefits : एसटी महामंडळाच्या पुनरुत्थानासाठी ‘प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून काम करण्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले. प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा संकल्प असून, कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठीही विशेष योजना हाती घेतल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन वातानुकूलित चालक-वाहक विश्रांतीगृहाचे लोकार्पण
खोपट बसस्थानकावरील नूतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक-वाहक विश्रांतीगृहाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, तसेच एसटी महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार उपस्थित होते.
एसटीचे रूप बदलेल – फाईव्ह स्टार बसपोर्ट उभारणार!

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) माध्यमातून ५०० कोटी रुपये खर्चून राज्यातील १९१ बसस्थानकांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. “खड्डेमुक्त बसस्थानक” हा शासनाचा संकल्प असून, भविष्यात प्रवाशांसाठी एअरपोर्टसारखी अत्याधुनिक बसपोर्ट्स उभारण्यात येणार आहेत.
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 7 वा वेतन आयोगाचा प्रलंबित हप्ता मंजूर
एसटी चालक-वाहकांसाठी अद्ययावत विश्रांतीगृहे
एसटीच्या चालक-वाहकांना प्रवासानंतर आरामदायी झोप मिळावी यासाठी प्रत्येक आगारात वातानुकूलित, स्वच्छ व टापटीप विश्रांतीगृहे उभारण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी एसटी प्रशासनाला दिले. खोपट बसस्थानकावरील नव्याने उभारलेल्या विश्रांतीगृहाचे कौतुक करत, हे ‘रोल मॉडेल’ संपूर्ण राज्यभर राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!
एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोफत रुग्णालय योजना!
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले की, एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून १०० खाटांचे कॅशलेस रुग्णालय प्रत्येक आगारात उभारले जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार असून, एसटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत.
जन आरोग्य योजनेत 1356 आजारांवर विनामूल्य उपचार! तुमच्या जिल्ह्यातील हॉस्पिटल लिस्ट पाहा
एसटी बसचे नवे दर जाहीर! येथे पाहा
एसटी कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वाचा संदेश
✅ प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा
✅ खड्डेमुक्त आणि अत्याधुनिक बसस्थानक उभारणार
✅ प्रत्येक आगारात वातानुकूलित विश्रांतीगृहे
✅ एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोफत कॅशलेस रुग्णालय