shikshan vibhag meeting
Shikshan Vibhag Meeting : शालेय शिक्षण विभागाकडील योजना, उपक्रम कार्यक्रम मिशन मोडवर राबवावेत. यामध्ये १०० दिवसांचा कार्यक्रम, नवीन शैक्षणिक धोरण व RTI ची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या.
मंत्रालयातील समिती सभागृहात शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला. यावेळी प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण संचालक आर. विमला, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, बालभारतीचे कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
केंद्र शासनाने जाहीर केलेले नवीन शैक्षणिक धोरण राज्यात राबविताना याची सर्व शाळांना पूर्व सूचना द्यावी. यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण संबंधितांना देण्यात यावे. अभिनव प्रयोगांद्वारे, शालेय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण करावे. शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारणा आणि भविष्यकालीन धोरणांवर लक्ष केंद्रित करावे. शिक्षकांच्या कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी अधिक प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी.
हे ही वाचा : सार्वजनिक सुट्ट्यांची संपूर्ण यादी | कंत्राटी कर्मचारी बदली बाबत | करार कर्मचारी पगार वाढ GR | अंगणवाडी व मदतनीस कर्मचारी | शासन सेवेत समायोजन | HSC हॉल तिकीट
आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू- डायरेक्ट लिंक
तसेच, दहावी, बारावी परीक्षा कॉपी मुक्त व्हाव्यात हे शिक्षण विभागाचे अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष राहिले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कॉपींगपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांना कॉपी मुक्त परीक्षा देण्यासाठी प्रेरित करावे. यासाठी जे जे उपाय करता येतील ते करावेत, अशा सूचना आढावा बैठकीत दिल्या.
शिक्षणात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी उपाययोजना करून शाळांमध्ये पाणी, शौचालय, स्वच्छता, क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एका शाळेला भेट दिली पाहिजे. या भेटीचा अहवाल त्यांनी शिक्षण विभागास सादर करावा.
शालेय शिक्षण विभागाच्या 100 दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण; बैठकीतील ठळक मुद्दे
पीएमश्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएमश्री शाळा योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या योजनेतंर्गत तालुका स्तरावर किमान एक आदर्श शाळा झाली पाहिजे. या शाळेत ग्रंथालय, लॅब, क्रीडा विभाग यासाठी आवश्यक साधने असावीत. ही शाळा डिजिटल सुविधांनी परिपूर्ण असावी.
जर्मनी देशात कुशल मनुष्यबळ पुरवणे या कामास गती देण्याच्या सूचना करून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधितांशी पत्रव्यवहार करावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत विद्यार्थ्यांचे शिक्षण, शिक्षकांची क्षमता, शाळांच्या सुविधांची स्थिती, विविध योजनांची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार, शालेय अभ्यासक्रमाशी निगडित बाबी, शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण, शिष्यवृत्ती योजना, पवित्र पोर्टल यासह विभागाकडील विविध योजना व उपक्रमाची माहिती जाणून घेऊन संबंधितांना आवश्यकत्या सूचना दिल्या.
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…