शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी स्वीकारला शालेय शिक्षण विभागाचा पदभार | School Education Minister Dadaji Bhuse

विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या नाशिक येथील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि खासगी शाळेच्या विविध 50 विद्यार्थ्याच्या उपस्थितीत मंत्रालयात शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे (School Education Minister Dadaji Bhuse) यांनी शालेय शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारला.

School Education Minister Dadaji Bhuse
School Education Minister Dadaji Bhuse

गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यालाही स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण (quality education) घेता यावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे (School Education Minister Dadaji Bhuse) यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले की, शालेय शिक्षण (School Education) विभागाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असणार आहेत. आनंददायी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विभाग काम करणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवोदय विद्यालय परीक्षा हॉल तिकीट व प्रश्नपत्रिका येथे पाहा

राज्यात पहिली ते बारावीपर्यंतचे सव्वा दोन कोटी विद्यार्थी आहेत. एक लाख 8 हजार शाळा असून 7 लाख 29 हजार शिक्षक आहेत. विविध उपक्रम योजनांसाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल. पुढील काही दिवसात शिक्षक, विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्था (educational institutions) यांच्याशी चर्चा करून त्यांचे मनोगत आणि अनुभव जाणून घेणार आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात येतील. यासाठी ग्रामस्थ आणि पालकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येईल.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2025 वेळापत्रक जाहीर

शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच आरोग्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी विभाग कटिबध्द असल्याचे श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

‘शिक्षण सेवक’ योजना लागू न करता थेट नियमित वेतनश्रेणीत नियुक्ती देण्याबाबत – शासन निर्णय

महाराष्ट्राला शैक्षणिक चळवळीचा वारसा आहे. शिक्षण क्षेत्राला देदिप्यमान परंपरा आहे. पुढेही ही परंपरा कायम राहणार असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित विविध 50 विद्यार्थ्यांनी माध्यमांशी संवाद साधला, प्रांजली जाधव या विद्यार्थिनीने महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह महापुरुषांनी स्त्री स्वातंत्र्यासह शिक्षणाचे महत्व पटवून दिले. याची माहिती भाषणातून दिली.

राज्यातील शिक्षण विभागातील या करार कर्मचाऱ्यांना फरकासहित वाढीव मानधन मिळणार

Leave a Comment