Salary Arrears : अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षक अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून ते मार्च २०२३ पर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन देण्याचा महत्वाचे दोन शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे.
सदर विशेष शिक्षकांना वेतन न मिळाल्यामुळे मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने याबाबत निर्णय घेतला आहे. दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार ५७,५६,३८०/- (सत्तावन्न लक्ष छप्पन्न हजार तीनशे ऐंशी रुपये) एवढ्या रकमेला मान्यता दिली आहे.
राज्यातील ‘या’ कंत्राटी शिक्षकांना यापुढे नियुक्ती मिळणार नाही
स्टाफ नर्स पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
📜 शासन निर्णयाची प्रमुख वैशिष्ट्ये
✅ मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल अवमान याचिका च्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
✅ विशेष शिक्षकांच्या थकीत वेतनासाठी मंजूर निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
✅ शासनाने हा खर्च 2024-25 च्या आर्थिक वर्षातील ‘समग्र शिक्षा अभियान’ अंतर्गत उपलब्ध बजेटमधून करण्याचा निर्णय घेतला आहे.
✅ सदर शासन निर्णय दिनांक 11 फेब्रुवारी 2025 नुसार मंजुरी देण्यात आली आहे.
विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणेबाबत. शासन निर्णय 1 येथे पहा
विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणेबाबत. शासन निर्णय 2 येथे पहा
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 7 वा वेतन आयोगाचा प्रलंबित हप्ता मंजूर