ताज्या बातम्या

‘आरटीई’ प्रवेश लॉटरी निवड यादी निकाल जाहीर! प्रवेशासाठी या तारखेपर्यंत मुदत RTE Lottery Result 2025-26 PDF Download

RTE Lottery Result 2025-26 PDF Download : ‘आरटीई’ २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शालेय शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत १० फेब्रुवारी २०२५ रोजी लॉटरी सोडत काढण्यात आली. यानुसार, १४ फेब्रुवारीला निवड यादी www.student.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होईल, आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान प्रवेश घ्यावा लागेल, अशी माहिती शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी दिली.

1 लाख 9 हजार 111 विद्यार्थ्याना खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश

राज्यभरातून RTE राखीव जागांसाठी 3 लाख 5 हजार 159 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे, मात्र महाराष्ट्र राज्यात आरटीई अंतर्गत 1 लाख 9 हजार 111 राखीव जागा आहे, या जागांवर राज्यातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.

पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना

  1. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कागदपत्र पडताळणीसाठी गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे संपर्क साधावा.
  2. ऑनलाईन नोंदणी आणि तात्पुरत्या प्रवेशासाठी अलॉटमेंट लेटर आवश्यक असेल.
  3. कागदपत्र पडताळणीस गैरहजर राहिल्यास पालकांना दोन संधी मिळणार आहेत.
  4. फक्त SMS वर अवलंबून राहू नका! वेळोवेळी RTE Portal वर सूचना तपासा. अर्जाचे स्टेट्स येथे चेक करा

‘आरटीई’ प्रवेश लॉटरीची यादी जाहीर, होताच मेसेज (SMS) वर विसंबून न राहता अर्जाची येथे करा पडताळणी

महत्त्वाची सूचना – प्रवेश प्रक्रियेस विलंब मान्य होणार नाही!

  • २८ फेब्रुवारीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही.
  • विहित कालावधी संपल्यानंतर कोणत्याही अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही.
  • खोटी किंवा चुकीची माहिती भरल्यास प्रवेश तत्काळ रद्द केला जाईल.

आरटीई २५ टक्के प्रवेश अधिकृत वेबसाईट : https://student.maharashtra.gov.in/

आरटीई प्रवेश प्रक्रिया कोणासाठी?

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत, दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी स्वयं-अर्थसहाय्यित, विना-अनुदानित, पोलीस कल्याणकारी आणि महानगरपालिका शाळांमध्ये आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.

Maha News

Recent Posts

विधानसभा प्रश्नोत्तरे: Maharashtra Assembly Questions and Answers

Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…

1 week ago

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारची मोठी घोषणा – आता मिळणार १५,००० रुपये आर्थिक मदत!

PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…

2 weeks ago

माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर Mathadi Workers

Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…

2 weeks ago

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री  मेघना बोर्डीकर यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा Health Minister study tour to Tamil Nadu

Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर…

2 weeks ago