आरटीई 25 टक्के राखीव जागांसाठी नवीन नियमावली लवकरच! RTE Admission New Regulations

RTE Admission New Regulations : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अंतर्गत शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी या प्रवेश प्रक्रियेला अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी महाराष्ट्र शासन लवकरच नवीन नियमावली आणणार आहे. यासाठी राज्य शासनाने खालील निर्णय घेतला आहे.

नवीन समितीची स्थापना

राज्य शासनाने एक समिती गठीत केली आहे. शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती सध्याच्या नियमांचा अभ्यास करून सुधारणा सुचवेल. समितीची रचना खालीलप्रमाणे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समितीचे कार्य

नियमांमध्ये सुधारणा: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अंतर्गत असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करणे.

एकत्रित नियमावली: राज्य शासनाकडून अधिसूचित करण्यात आलेल्या दि. ११.१०.२०११ रोजीच्या नियमामध्ये सुधारणा करून एकत्रित शासनास शिफारस करणे.

आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित; या मानवी दिनांकावर ठरणार वयोमार्यादा

समस्यांचे निराकरण: आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने दि. १५.०३.२०१३ रोजी अधिसुचित केलेले नियम व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सर्व सुधारणा एकत्रित करून त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी शासनास शिफारस करणे.

शाळांना प्रतिपूर्ती : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतर्गत शाळांना प्रतिपूर्ती देण्यासंदर्भात उद्भवणाऱ्या न्यायालयीन प्रकरणांबाबत उपाययोजना/ सुचना याबाबत शासनास शिफारशी करणे.

RTE प्रवेश प्रक्रिया: कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती अर्ज आले?

दोन महिन्यात अहवाल : समिती दोन महिन्यांच्या आत शासनाला आपला अहवाल सादर करेल. या अहवालाच्या आधारावर नवीन नियम तयार केले जातील.

आरटीई प्रवेश ऑनलाईन अर्ज येथे करा डायरेक्ट लिंक

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अंतर्गत बालकांच्या शाळांमधील राखीव २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारीत नियम तयार करण्याच्या अनुषंगाने समिती गठीत केली आहे.

मोठी अपडेट! MahaTET परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर! Maha TET Final Result Direct Link

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय येथे पाहा

शालेय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता आहारात मिळणार ‘हे’ नवीन पदार्थ!

Leave a Comment