RTE Admission 2024-25 : आरटीई 25% प्रवेश प्रकिया 2024-25 ची लॉटरी यादी अखेर जाहीर झाली आहे, आता ज्या मुलांची निवड झाली आहे, त्यांना Admit Card उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रवेश निश्चित करण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना देण्यात आल्या असून, पालकांना दिनांक २३ जुलै २०२४ ते ३१ जुलै २०२४ पर्यंत आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करावा लागणार आहे, सविस्तर सूचना वाचा..
निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी काढून घ्यावी. पालकांनी आपल्या बरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी. अशा स्पष्ट सूचना RTE पोर्टलवर देण्यात आल्या आहेत.
एसएमएस वर अवलंबून न राहता लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करा
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 (RTE Admission 2024-25) या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी.
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी सूचना
- प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.
- निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.
आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी महत्वाच्या सूचना
RTE Admission 2024-25 : आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी निवड झालेल्या पालकांना एसएमएस (SMS) सोमवारी पाठविण्यात येणार असून, उपलब्ध प्रवेशपत्रानुसार पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
- https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर verification committee या tab वर click करावे आणि शाळेच्या जवळील पडताळणी केंद्रावर जावे.
- एका बालकाचे एका पेक्षा जास्त अर्ज आढळून आल्यास त्याचा लॉटरी द्वारे मिळालेला प्रवेश रद्द करणे अथवा योग्य ती कारवाई केली जाईल.
- अर्जात नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित / मूळ प्रति घेऊन पडताळणी समितीकडे जावे.
- भाडेकरार हा दुय्यम कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. फक्त भाडे करार हा पर्याय नाही याची नोंद घ्यावी परंतु भाडेकरार हा Form भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. व त्याचा कालावधी 1 वर्षाचा असावा.
- सर्व कागदपत्रांच्या 2 copy काढाव्यात. त्यापैकी एक संच पडताळणी समितिकडे submit करावा आणि एक संच शाळेत submit करावा
- उत्पन्नाचा दाखला/जात प्रमाणपत्र परराज्यातील ग्राहय धरला जाणार नाही.
- पडताळणी समितीकडून सर्व कागदपत्रे तपासून घ्यावीत.
- निवासी पुरावा म्हणून बैंक पासबुक हे राष्ट्रीयकृत बँकेचेच ग्राहय धरले जाईल. तसेच निवासी पुरावा म्हणून गॅसकार्ड रदद करण्यात आलेले आहे. • आपला online प्रवेश झाल्याची रिसीट/पावती, Allotment Letter, हमीपत्र आणि प्रवेशाची कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा.
- पालकांनी अर्ज भरताना नमूद केलेला निवासी पुरावा पत्ता आणि गुगल लोकेशन यात तफावत आढळल्यास पडताळणी समिती आपला प्रवेश रदद करील Verification Committee कडुन आल्यावर पालकांना School Copy दिली जाईल पालकांनी School Copy आणल्यानंतरच शाळेने प्रवेश देण्याची कार्यवाही विहित मुदतीतच पूर्ण करावी.
- पालकांनी लॉटरी द्वारा प्राम झालेल्या शाळेची माहिती (भौतिक सुविधा शाळेचा बोर्ड इत्यादी) पाहून मगच शाळेत प्रवेश घ्यावा, प्रवेश घेतल्यानंतर या बाबत कोणतीही तक्रार चालणार नाही
- अर्जाच्या पडताळणीसाठी तुमच्या ADMIT CARD वर दिलेल्या शाळेच्या नजिकच्या केंद्रावरती आवश्यक कागदपत्रांसहित उपस्थित राहावे.
‘आरटीई’ 25 टक्के प्रवेशाची जिल्हानिहाय लॉटरी यादी येथे पहा
RTE Official Website : https://student.maharashtra.gov.in/