Resident Doctors Facilities : राज्यातील निवासी डॉक्टर रुग्णसेवेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या सुरक्षेसह उत्तम राहण्याची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविद्यालये आणि रुग्णालयांना आवश्यक सुविधा पुरवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
मंत्रालयात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) च्या विविध मागण्यांबाबत बैठक झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले, उपसचिव तुषार पवार, शंकर जाधव आदी उपस्थित होते.
सुरक्षा आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर
- रुग्णालयांमध्ये अलार्म सिस्टीम व सीसीटीव्ही बसविणे आवश्यक.
- रुग्ण कक्षाशेजारी निवासी डॉक्टरांसाठी साईड रूम उपलब्ध करणे.
- महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये स्वतंत्र पोलिस चौकी सुरू करण्यासाठी गृह विभागासोबत समन्वय.
- निवासी डॉक्टरांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे निर्देश.
वसतीगृह आणि घरभाडे भत्ता
- नवीन वसतीगृहे बांधण्याच्या प्रस्तावास मान्यता.
- वसतीगृह उपलब्ध नसल्यास भाडेतत्वावर इमारती घेण्याचा विचार.
- निवासी डॉक्टरांना घरभाडे भत्ता देण्याचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना.
आरोग्य विभाग : त्या उमेदवारांची नियुक्ती अखेर नियुक्ती रद्द, नेमके कारण व यादी पाहा
इतर महत्त्वाचे निर्णय
- निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन वेळेवर मिळावे.
- शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांसाठी पास प्रणाली लागू करण्यावर चर्चा.
- प्रलंबित महागाई भत्ता संदर्भात महाविद्यालय स्तरावरून माहिती घेऊन कार्यवाही करावी.
डॉक्टर आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी मोठी भरती!
आरोग्य विभागातील 2000 रिक्त पदे
या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या हिताच्या अनेक मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले. डॉक्टरांच्या सुरक्षिततेपासून त्यांच्या सोयीसुविधांपर्यंत (Resident Doctors Facilities) सरकार सकारात्मक पावले उचलत आहे.