Regular Pay Scale : पवित्र पोर्टल (Pavitra Portal) द्वारे नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षण सेवक योजना लागु न करता नियमित वेतनश्रेणीत (Regular Pay Scale) नियुक्ती बाबत व वेतनास संरक्षण देण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे.
राज्यामध्ये पवित्र पोर्टल (Pavitra Portal) अंतर्गत शिक्षक भरती (Shikshak Bharati) करण्यात आली, शिक्षक भरती झालेल्या उमेदवारांना 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागतो, त्यानंतर सदर शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात येते.
मात्र शालेय शिक्षण विभाग व क्रिडा विभागाचे दि. १६/१२/२०२२ व दि. १५/०९/२०११ चे शासन निर्णयानुसार पावित्र पोर्टल (Pavitra Portal) द्वारे नियुक्त शिक्षण सेवक यांना शिक्षण सेवक (Shikshan Sevak) योजना लागू न करता नियमित शिक्षक पदावर नियुक्ती देण्याबाबत तसेच त्यांना त्यांच्या पूर्वीच्या सेवेच्या वेतनास संरक्षण देण्याबाबत तरतूद आहे.
आशा स्वयंसेविकांना मोफत टॅब येथे क्लिक करा
राज्यातील या कंत्राटी शिक्षकांचे नियमित वेतनश्रेणीत समायोजन
नियमित शिक्षक पदावर कार्यरत शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे/स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे दूस- या समान (प्राथमिक मधून प्राथमिक, माध्यमिक मधून माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय) तसेच उच्च/असमान (प्राथमिक मधून माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय अथवा माध्यमिक मधून उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय) पदावर नव्याने नियुक्ती झाली असल्यास अशा शिक्षकाच्या पुर्वीच्या वेतनास संरक्षण देतेवेळी विहित मार्गाने नव्याने शिक्षक पदावर नियुक्ती देतांना त्यांना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती न देता नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. याबाबतचे शासन निर्णय खालील प्रमाणे
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का? येथे चेक करा
दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजीचा शासन निर्णय पाहा
दिनांक 15 सप्टेंबर 2011 रोजीचा शासन निर्णय पाहा
त्यामुळे अशा शिक्षकांना शिक्षक या पदावर सेवा केली असल्याने त्यांना शिक्षण सेवक योजना लागू न करता नियमित शिक्षक पदावर नियुक्ती तसेच पुर्वीच्या सेवेच्या वेतनास संरक्षण देण्यात येते. याबाबत महत्वाच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे
सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटी संदर्भात
महत्वाच्या अटी व शर्ती
१) निवड झालेल्या नवीन पदाची व पूर्वीच्या पदाची वेतनश्रेणी समान असल्यास कर्मचाऱ्यास पूर्वीच्या पदावरील सेवाजेष्ठता लागू होणार नाही. तथापि, पूर्वीच्या पदावरील सेवा ग्राह्य धरून वरिष्ठ निवड श्रेणीचे लाभ देय होतील.
२) शासन निर्णय दिनांक १५/०९/२०११ नुसार नवीन नियुक्ती प्रकरणी पूर्वीची सेवा सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य राहील,
३) सदर पदावरील नियुक्ती ही नवीन नियुक्ती असल्याने वेतनास संरक्षण देण्यात आले तरी नियमानुसार परिविक्षाधिन कालावधी लागू राहील.