Public Holiday : विधानसभा निवडणुकीला शासकीय सुट्टी जाहीर

Public Holiday : विधानसभा निवडणुक 2024 दि 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे, राज्यातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीला शासकीय सुट्टी जाहीर

महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने बुधवार दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सर्व विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

मंत्रालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी सदरची अधिसूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे/मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू असणार आहे.

राज्यातील ‘याच’ शाळांना सलग ‘3’ दिवस सुट्टी मिळणार

Election-Holiday

Leave a Comment