ताज्या बातम्या

Pensioners : खुशखबर! पेन्शनच्या विलंबाला आता पूर्णविराम! नवीन प्रणाली सुरू!

Pensioners : राज्यातील ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त सर्व जिल्हा परिषदामधून सेवानिवृत्त झालेलय कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शासनाकडुन निवृत्ती वेतनाचे अनुदान वेळेत प्राप्त होऊनही निवृत्तीवेतन धारकांच्या खात्यामध्ये निवृत्तीवेतन जमा होण्यास विलंब होत होता. सदर विलंब टाळण्यासाठी शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

निवृत्तीवेतन धारकांच्या खात्यामध्ये निवृत्तीवेतन वेळेत जमा करण्यासाठी आता नवीन प्रणाली मधून Retired Pension जमा होणार आहे.

हे ही वाचा : कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन ग्रॅच्युइटी देण्याबाबत सुधारित शासन येथे पाहा

राज्यातील या जिल्ह्यात प्रथम टप्प्यात सुधारीत कार्यपध्दती सूरू

प्रथम टप्प्यात राज्यातील जिल्हा परिषद सातारा, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नाशिक, नंदुरबार, बुलढाणा, सांगली, वर्धा, भंडारा यांनी माहे जानेवारी, २०२५ देय फेब्रुवारी, २०२५ च्या निवृत्तीवेतन प्रदानाची नवीन निवृत्तीवेतन प्रणालीतून सुरुवात करण्यात येईल. तद्नंतर उर्वरित जिल्हा परिषदांमध्ये ही सुधारीत कार्यपध्दती प्रत्यक्षात माहे देय फेब्रुवारी, २०२५ पासून टप्याटप्याने सूरू करण्यात येणार आहे.

सरकारी कर्मचार्‍यांसाठी वेतन आणि पेन्शन वितरण; बँकांची सुधारित यादी जाहीर

जिल्हा परिषदामधून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतन धारकांचे (शिक्षक/शिक्षकेत्तर वगळून) निवृत्तीवेतन विनाविलंब व देय दिनांकास होणेकरीता आत्तापर्यंत मनुष्यबळाव्दारे तयार करण्यात येणारी निवृत्तीवेतन (Pension) देयके आता मे. महाआयटी लि. यांचेकडून विकसित नवीन निवृत्तीवेतन प्रणालीमधून निर्माण (Generate) करूनच तयार करण्यात येणार आहे.

राज्यातील या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भात – राज्य शासनाचे स्पष्टीकरण

नविन निवृत्तीवेतन प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम जिल्हा परिषदेच्या सर्व निवृत्तीवेतन धारकांची (शिक्षक/शिक्षकेतर वगळून) अचूक आणि परीपूर्ण माहिती प्रणालीमध्ये भरणे व त्याआधारे प्रणालीमधून निवृत्ती वेतन देयके तयार करणे हि उद्दिष्टे विचारात घेऊन मे. महाआयटी लि. यांच्याकडून निवृत्तीवेतन प्रणाली तयार करण्यात आलेली आहे.

राज्यातील कर्मचाऱ्यांच्या ‘पेन्शन’ योजनेच्या संदर्भात नवीन शासन निर्णय

निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये जिल्हा परिषदाअंतर्गत पंचायत समिती स्तरावरील निवृत्तीवेतन धारकांची आवश्यक ती बिनचूक माहिती भरण्याचे (Data Entry) व भरलेली माहिती बरोबर आहे खात्री करण्याची पूर्ण जबाबदारी संबधित गटविकास अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) सुधारीत कार्यपध्दती – शासन निर्णय निर्गमित

निवृत्तीवेतन सुधारित कार्यपध्दती

  • नविन निवृत्तीवेतन प्रणालीमधून नियमित निवृत्तीवेतन देयके, निवृत्तीवेतन प्रकरणे तयार करणे याबाबतचे अधिकार व कार्यपध्दती
  • अनुदान वितरण व संवितरण याबाबतची कार्यपध्दती
  • निवृत्तीवेतन देयकातील वजाती बाबतची कार्यपध्दती
  • बँकेमार्फत निवृत्तीवेतन प्रदान करणेची कार्यपध्दती
  • मासिक निवृत्तीवेतन विषयक खर्चाच्या बाबी जिल्हा लेख्यामध्ये समाविष्ठ करण्याची कार्यपध्दती

ग्रामविकास विभागाने 17 जानेवारी 2025 रोजी निवृत्तीवेतन सुधारित कार्यपध्दती निश्चित केली आहे.

अधिक माहितीसाठी : निवृत्तीवेतन सुधारित कार्यपद्धती वाचा

Maha News

Recent Posts

विधानसभा प्रश्नोत्तरे: Maharashtra Assembly Questions and Answers

Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…

1 week ago

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारची मोठी घोषणा – आता मिळणार १५,००० रुपये आर्थिक मदत!

PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…

2 weeks ago

माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर Mathadi Workers

Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…

2 weeks ago

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री  मेघना बोर्डीकर यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा Health Minister study tour to Tamil Nadu

Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर…

3 weeks ago