राज्यातील अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील शासकीय आश्रमशाळा, विद्यानिकेतन आणि निवासी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) मोठा बदल झाला आहे. दिनांक 1 नोव्हेंबर, 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन लेखाशिर्ष उघडण्यात आले आहे.
या बदलामुळे काय होणार?
या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या जमा रकमा योग्य प्रकारे NPS खात्यात जमा होतील आणि त्यांना त्यांच्या निवृत्तीवेतनाचे लाभ मिळण्यास मदत होईल.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! नवीन निवृत्तिवेतन योजना लागू!
कोणाला होणार फायदा?
या निर्णयाचा फायदा राज्यातील शासन अनुदानित विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा, निवासी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या होणार आहे.
अधिक माहितीसाठी: शासन निर्णय पाहा