NHM GR : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका यांच्या वाढीव मानधनानुसार गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ 4 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, याबाबतचा शासन निर्णय दिनांक 20 सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात राज्य मंत्रीमंडळाच्या दिनांक २५/०८/२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे.
राज्यातील गटप्रवर्तकांचे वाढीव मानधन फरकासहित रक्कम कधी मिळणार?
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कामकाज करीत असतात.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना यापूर्वी राज्य शासनाच्या निधीतुन अनुक्रमे रु.५०००/- व रु.१০০০/- इतकी वाढ करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून रु.१०,०००/- व केंद्र शासनाच्या निधीतून रु.३०००/- असे एकुण रु.१३,०००/- इतके मानधन अदा करण्यात येते.
तसेच, गटप्रवर्तकांना राज्य शासनाच्या निधीतून रु.७२००/- व केंद्र शासनाच्या निधीतून रु.८७७५/- अशी एकुण रु.१५,९७५/- इतके मानधन अदा करण्यात येते.
तसेच आशा स्वयंसेविकांना रु.५०००/- इतकी तर त्याचवेळी गटप्रवर्तकांना केवळ रु.१०००/- इतकी वाढ मंजूर करण्यात आली आहे. सदर वाढीमध्ये असलेल्या मोठ्या तफावतीमुळे गटप्रवर्तकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली होती. तसेच, सदर तफावत दुर करण्याबाबत वारंवार निवेदने प्राप्त झाले होते.
सद्यस्थितीत महागाईच्या निर्देशांकात होत असलेली वाढ तसेच, आरोग्य व पोषण यासंदर्भातील गटप्रवर्तकांची भुमिका व जबाबदारी विचारात घेवून गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय येथे पहा