NHM Contractual Staff Regularisation : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेत कायम करण्याच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली असून, कर्मचाऱ्यांची अंतरीम जेष्ठता यादी जाहीर करण्याचे वेळापत्रक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य कार्यालयाकडून दिनांक 31 जुलै रोजीच्या परिपत्रकानुसार जाहीर करण्यात आले आहे.
दिनांक 14 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत कायम होणार
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित (NHM Contractual Staff Regularisation) करण्याच्या दिनांक 14 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार आता प्रत्यक्ष कार्यवाही सुरु करण्यात आली असून, लवकरच NHM कर्मचारी नियमित होणार आहे.
या शासन निर्णयानुसार आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांची सेवा 10 वर्ष पूर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांना सरळसेवा भरती मधील रिक्त 30 टक्के समकक्ष पदांवर शासन सेवेत समायोजन करण्यात आहे.
जेष्ठता यादी शासन मार्गदर्शक सुचनानुसार तयार करण्याचे निर्देश
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (National Health Mission) कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांची दिनांक 1 जानेवारी 2024 रोजीची कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांची पदनिहाय जेष्ठता यादी शासन मार्गदर्शक सुचनानुसार तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार त्वरित शासन सेवेत कायम करा
सदर जेष्ठता यादी तयार करताना शासन अधिसुचना दिनांक 21 जून 2021 नुसार जेष्ठता सूची विहीत नमुन्यात माहिती सकल मराठी (फॉन्ट साईज 12) व English Times New Roman (फॉन्ट साईज 12) या फॉन्टमध्ये तयार करण्याच्या सूचना संबंधित राज्यातील सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या संदर्भात लेटेस्ट (2) महत्वाचे शासन निर्णय पाहा
या तारखेला अंतरीम जेष्ठता यादी जाहीर होणार
जेष्ठता यादी (Service Seniority List) तयार करताना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजुर एकूण 69 संवर्ग तसेच वेतन सुसुत्रिकरणानंतर निर्माण करण्यात आलेल्या पदांची स्वतंत्र सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात यावी. याकरीता खालीलप्रमाणे कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. (NHM Contractual Staff Regularisation)
- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजुर 69 संवर्गाची तसेच वेतन सुसुत्रिकरणानंतर निर्माण करण्यात आलेल्या पदांची स्वतंत्र अंतरीम जेष्ठता यादी तयार करून ती आपल्या स्तरावर नियुक्ती प्राधिकारी यांचे स्वाक्षरीने जाहिर प्रसिध्द करण्यासाठी – दिनांक 8 ऑगस्ट 2024 पर्यंत कालावधी ठरवून देण्यात आला आहे.
- अंतरीम जेष्ठता यादीच्या अनुषंगाने हरकती व आक्षेप नोंदवण्याकरीता 12 दिवस – दिनांक 8 ऑगस्ट 2024 ते दिनांक 20 ऑगस्ट 2024
- प्राप्त झालेल्या हरकती व आक्षेप यांचे निराकरण करणे 6 दिवस
दिनांक 21 ऑगस्ट 2024 ते दिनांक 27 ऑगस्ट 2024 - हरकती व आक्षेप यांचे निराकरण करुन अंतिम जेष्ठता यादी नियुक्ती प्राधिकारी यांचे स्वाक्षरीने प्रसिध्द करुन ती अचुक असल्याचे प्रमाणपत्रासहीत व हार्डकॉपी व सॉप्टकॉपीसह राज्य कार्यालयास पाठविणे – दिनांक 31 ऑगस्ट 2024
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करणेबाबत सुधारित निकष पाहा
जेष्ठता यादी तयार करण्याबाबत : परिपत्रक येथे पाहा
अधिक माहितीसाठी : दिनांक 14 मार्च 2024 रोजीचा शासन निर्णय पाहा
मंत्रिमंडळ बैठकीत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, गटप्रवर्तकांसाठी मोठा निर्णय पाहा
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करणेबाबत सुधारित निकष पाहा