NHM Contractual Employees Regularization Order : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांपैकी १० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतीबंधातील नियमित पदावर समायोजनाने नियमित करण्याबाबत कर्मचाऱ्यांचे आदेश काढण्यात आले आहे.
NHM कंत्राटी कर्मचा-यांचे समायोजन करण्याबाबत निर्णय
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समायोजनाबाबत मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १८/०८/२०२३ व दिनांक ३१/१०/२०२३ रोजी बैठका आयोजित करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये आरोग्य विभागामध्ये दर वर्षी रिक्त होणा-या पदांवर सरळसेवेने भरण्यात येणा-या कोटयापैकी सरळसेवेने ७० टक्के व उर्वरित ३० टक्के पदावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत किमान १० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचा-यांचे समायोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता.
त्या अनुषंगाने प्रस्ताव मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक १३/०३/२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला होता. मा. मंत्रीमंडळाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समायोजनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्ष पदांचे सेवाप्रवेश नियन सुधारित करुन त्याना सरळसेवेने ७० टक्के व दर वर्षी समावेशनाने ३० टक्के भरती करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांची भरती – जाहिरात, अर्ज डायरेक्ट लिंक
सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, पहा संपूर्ण यादी
शासन सेवेतील समायोजनाचे नियुक्ती आदेश निर्गमित
सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंजूर आकृतीबंधातील वाहन चालक या नियमित पदावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील समान, समकक्ष व शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र ठरणा-या वाहन चालक संवर्गाच्या पदांची अंतिमतः प्रसिध्द झालेल्या राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठतेनुसार एकवेळची बाब म्हणून वाहन चालक या पदावर सेवा समायोजित करून पदस्थापनेसह शासन सेवेतील समायोजनाचे नियुक्ती आदेश (NHM Contractual Employees Regularization Order) निर्गमित करण्यात आले आहे.
सविस्तर अटी व शर्ती आणि कर्मचारी यादी येथे पाहा
लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वाची अपडेट
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करणेबाबत सुधारित निकष पाहा