NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करणेबाबत सुधारित निकष पाहा

NHM Contractual Employees Regularisation : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समावेशनाची प्रक्रिया सुरू झाली असून, सेवा जेष्ठता यादी सुधारित निकषानुसार तयार करण्यात येत आहे, काय आहेत निकष? पाहूया..

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समावेशनासाठी ज्येष्ठतासुच्या तयार करण्यासाठी मार्गदर्शक सुचनांबाबतचा प्रस्ताव शासनाने अंतिम केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार तयार करण्यात येत आहे.

कंत्राटी कर्मचारी सेवा ज्येष्ठता सूची तयार करताना शासनाने अंतिम केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार खालील प्रमाणे यादी तयार करण्यात येत आहे. याबाबत मार्गदर्शक सूचना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  1. सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांचा समावेश सेवाज्येष्ठता यादीत करण्यात यावा.
  2. बाहय स्त्रोत, कंपनी, एनजीओव्दारे नेमण्यात आलेले कर्मचा-यांचा तसेच दैनदिन वेतन पध्दतीवर ऑन कॉल बेसिस पध्दतीने, आशा, गटप्रवर्तक, अर्धवेळ कर्मचारी, मानद पध्दतीने कार्यरत असलेल्या कर्मचारी यांचा समावेश सदर जेष्ठता यादीत करण्यात येऊ नये.
  3. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कार्यरत असण्यापुर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (उदा. आरसीएच/टि.बी.) नियुक्ती असल्यास सदरच्या कर्मचा-याची सेवाज्येष्ठता दिनांक ते राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कंत्राटी सेवाकरार व रुजू दिनांकापासून ग्राहय धरण्यात यावी.
  4. पुर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कार्यरत असणारे कंत्राटी कर्मचारी तद्नंतर अन्य कार्यक्रमात कार्यरत असल्यास अशा कर्मचा-यांचा समावेश सेवाज्येष्ठता यादीत करता येणार नाही. (उदा. पंतप्रधान मंत्री मातृवंदना योजना)
  5. वेतन सुसुत्रिकरणानंतर (एकूण सवंर्ग ६९) जे संवर्ग निर्माण करण्यात आले आहेत अशा मंजूर संवर्गा करिता (एनएचएम पी.आय.पी मधील मंजूर पदे) त्यांचे पदनामाची स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी करण्यात यावी.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ संदर्भात ‘तीन’ महत्वाचे अपडेट

समावेशनासाठी प्रथम नियुक्तीचा दिनांक ग्राहय धरणार

राष्ट्रीय आरोग्य अभियान ही योजना सुरु होण्यापूर्वी काही इतर योजना कार्यरत असल्यास व सदर योजनांचा राष्ट्रीय आरोग्य अभियानात कर्मचा-यांसह समावेश केला असल्यास अशा कर्मचा-यांच्या समावेशनासाठी त्यांचा राष्ट्रीय आरोग्य अभियानात रुजू झाल्याचा दिनांक हा समावेशनासाठी प्रथम नियुक्तीचा दिनांक ग्राहय धरण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय येथे पाहा

राजीनामा

  1. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचारी सेवेत असतांना अभियान अंतर्गत इतर पदावरती विहीत पध्दतीने निवड होऊन सदर पदावर रुजू झाले असल्यास सदर कर्मचा-यांची सेवाज्येष्ठता प्रथम नियुक्तीचे रुजू दिनांकापासून ग्राहय धरण्यात यावी व सदर कर्मचा-यांचे प्रथम नियुक्तीच्या पदाशी समकक्ष असलेल्या पदावर समावेशन करण्यात यावे.
  2. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असतांना एखादया कर्मचा-याने स्वेच्छेने अन्य कारणास्तव राजीनामा दिला असल्यास व कालांतराने तो पुन्हा विहित पध्दतीचा अवलंब करुन भरती प्रक्रियेद्वारा रुजू झाल्यास त्याची सद्यस्थितीतील कार्यरत दुस-या पदावरील सेवाज्येष्ठता यादी करिता ग्राहय धरण्यात यावी.

न्यायालयीन प्रकरणा बाबत

न्यायालयीन प्रकरणाशी संबधीत कर्मचा-यांच्या बाबतीत मा. न्यायालयाच्या न्याय निकालाप्रमाणे कार्यवाही करावी कार्यवाही करावी.

यशस्विनी महिलांचे हक्काचे प्लॅटफॉर्म – या सुविधा मिळणार, येथे अवश्य भेट द्या

शैक्षणिक अर्हता

  1. अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचा-याचे प्रथम नियुक्तीच्या वेळी असलेली शैक्षणिक अर्हता व सद्यस्थितीत असलेली शैक्षणिक अर्हता सेवा रकान्यात नमूद करावी.
  2. वेतन सुसुत्रिकरणानुसार निश्चित करण्यात आलेल्या पदाच्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा एखाद्या कर्मचा-याकडे शैक्षणिक अर्हता कमी किंवा अन्य असेल तर अशा कर्मचा-यांस त्याच्या शैक्षणिक अर्हतेनुसार उपलब्ध असलेल्या अन्य पदावरील सेवाज्येष्ठता यादीत समावेश करावा.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना – सुधारित निकष येथे पाहा

सेवाखंड / रजा

  1. कार्यालयीन आदेशाप्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या रजा सेवाखंड धरण्यात येऊ नये. तसेच मंजूर रजेच्या व्यतिरिक्त विनावेतन मंजूर नसलेल्या (अनधिकृत गैरहजर) ३ महिने पर्यतचा कालावधी सेवाखंड धरण्यात येऊ नये.
  2. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचा-यांना विहित मुदतीत रुजू झालेल्या किंवा कार्यालयाने लेखी परवानगी निर्गमित केलेल्या कालवधीपर्यंत सेवाखंड धरण्यात येऊ नये.
  3. कंत्राटी कर्मचा-याना पुढील पुनर्नियुक्ती दिल्यानंतर रुजू होण्यास कमाल १ दिवसापर्यतचा कालावधी सेवाखंड धरण्यात येऊ नये.

बदली

अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचा-याची बदली किवा पदस्थापना बदललेली असल्यास पुर्वीच्या पदस्थापनेचा रुजू दिनांक सेवाज्येष्ठत्ता करिता ग्राहय धरण्यात येवून त्याचे समावेशन पुर्वी कार्यरत असलेल्या पदाशी समकक्ष असलेल्या पदावर करण्यात यावे.

या तारखेला अंतरीम जेष्ठता यादी जाहीर होणार

शासन स्तरावरुन उपस्थित झालेला मुद्दा व त्यावरील अभिप्राय पुढील प्रमाणे आहे.

कर्मचा-यांचे समावेशन करण्यापूर्वी त्यांची शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे, नियुक्ती आदेश, दोन नियुक्ती आदेशामधील असलेला खंड, सेवेची १० वर्ष पूर्ण होत असल्याबाबत, तसेच त्यांना अदा करण्यात आलेल्या मानधनासंदर्भातील संबंधित बँकचे विवरणपत्र इ. कागदपत्रे तपासण्यात यावीत.

अधिक माहितीसाठी : सुधारित निकष येथे परिपत्रक पाहा

Leave a Comment