NHM Asha Employees GR : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांचा वाढीव मोबदला माहे एप्रिल, मे आणि जून 2024 या महिन्याचा मोबदला लाभ देण्यासंदर्भात दोन महत्वाचे शासन निर्णय दिनांक 31 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे.
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरीता सर्वसाधारण योजनेंतर्गत सन 2024-25 च्या राज्यशासनाच्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना एप्रिल, मे आणि जून, 2024 या महिन्याचा मोबदला रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
याबाबतचा एप्रिल महिन्याचा वाढीव मोबदला देण्याबाबत 5 जुन तर मे आणि जून महिन्याचा मोबदला देण्याबाबत आवश्यक निधी दिनांक 27 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार (NHM Asha Employees GR) उपलब्ध करून देण्यात आला आहे.
लाडकी बहिण योजनेची ऑफलाईन – ऑनलाईन यादी येथे पाहा
आता या दोन्ही आदेशातील परिच्छेद क्रमांक 9 ऐवजी सदर अनुदान बिनशर्त आहे अशी सुधारणा परिच्छेद क्रमांक 10 मध्ये करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, गटप्रवर्तकांसाठी मोठा निर्णय पाहा
म्हणजेच आता एप्रिल, मे आणि जून महिन्याचा वाढीव मोबदला वितरीत करण्यासाठी सदरचे अनुदान हे बिनशर्त असणार आहे, त्यामुळे आता लवकरच राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना वाढीव मोबदला मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय (1) आणि शासन निर्णय (2) पाहा