NEW Textbook Policy : महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. सन 2023-24 पासून इयत्ता 2 री ते 8 वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याचा प्रयोग करण्यात आला होता. या निर्णयाचा उद्देश विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करणे आणि त्यांना अभ्यासाची सहजता उपलब्ध करून देणे हा होता. मात्र, या प्रयोगाचा अपेक्षित परिणाम मिळालेला नाही.
शासनाचा अहवाल आणि निरीक्षणे
शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार असे आढळले की, विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा उपयोग अपेक्षित पद्धतीने केलेला नाही. त्याऐवजी, बहुतेक विद्यार्थी अजूनही स्वतंत्र वह्या वापरत असल्याचे लक्षात आले. तसेच, विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजनही फारसे कमी झाले नाही. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
RTE प्रवेश प्रक्रिया: कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती अर्ज आले? येथे पाहा
नवीन निर्णय
शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता 2 री ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे वह्यांशिवाय पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हणजेच, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वतंत्र वह्या वापराव्या लागतील.
हा निर्णय घेताना विद्यार्थ्यांचा अभ्यास पद्धत, वह्यांचा वापर, आणि दप्तराच्या ओझ्यावर होणारा परिणाम यांचा विचार करण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता आहारात मिळणार ‘हे’ नवीन पदार्थ!
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय येथे पाहा