शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गट विमा योजनेचे नवीन दर जाहीर! New rates for group insurance plans

New rates for group insurance Plans : राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ बचत निधीच्या लाभ प्रदानाचे दि.०१ जानेवारी, २०२५ ते दि.३१ डिसेंबर, २०२५ या कालावधीकरिता परिगणितीय तक्ते जाहीर करण्यात आले आहे.

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ अंतर्गत माहे जानेवारी, २०२५ ते माहे डिसेंबर, २०२५ या वर्षामध्ये सदस्यत्व संपुष्टात आल्यास देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठीचा परिगणतीय तक्ता निर्गमित करण्यात आले आहेत.

सदर तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिटकरिता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मृत्यू, सेवानिवृत्ती, राजीनामा इत्यादी कारणांमुळे दि.१ जानेवारी, २०२५ ते दि. ३१ डिसेंबर, २०२५ या कालावधीत गटविमा योजनेचे सदस्यत्य संपुष्टात येणाऱ्या रु.६०/-प्रमाणे अंशदान करणाच्या सदस्यांच्या बचत खात्यामध्ये संचित होणारी बचत निधीची व्याजासह एकूण देय होणारी रक्कम दर्शविणारा तक्ता निश्चित करण्यात आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! नवीन निवृत्तिवेतन योजना लागू! विकल्प देण्यासाठी या तारखेपर्यंत मुदत

सोबतचा परिगणितीय तक्ता संचालक, लेखा व कोषागारे संचालनालयाचे पत्र क्र.संलेको/गवियो/२०२५/परिगणतीय तक्ते/१०/०७/३०९ दिनांक २० जानेवारी, २०२५ अन्वये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या परिगणनेनुसार निर्गमित केला आहे.

vima

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय येथे पाहा

मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुखांनी दिनांक १ जानेवारी, २०२५ पासून राजीनामा, सेवानिवृत्ती किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना/कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोबतच्या तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करावी.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी नवीन नियम लागू!

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ च्या परिच्छेद ८.४ अन्वये बचत निधीमधील शिल्लक रकमांवर दरसाल विहित दराने (तिमाही चक्रवाढ होणारे व्याज देण्याबाबत तरतूद आहे.

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या बचत निधीमधील संचित रकमांवर दि.०१ जानेवारी, २०२५ पासून दर साल दर शेकडा ७.१ टक्के दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज आकारण्यात आले आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या विमा निधीमधील संचित रकमांवर दर साल दर शेकडा ४ टक्के दरात कोणताही बदल झालेला नसल्यामुळे याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment