नवीन कामगार कायदे लागू करताना कामगारांचे संरक्षण सर्वोच्च प्राधान्य – कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे प्रतिपादन New Labour Code

New Labour Code : नवीन कामगार कायदे लागू करताना कामगार हिताची काळजी घेण्यात येईल तसेच भारतीय मजदूर संघाने घेतलेल्या हरकतींचा पूर्ण विचार केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले.

नवीन कामगार कायदे 2019 – 2020 पासून संसदेने पास केलेले असून ते लागू करण्याबाबत केंद्र व राज्य सरकार विचार करीत आहे. या पार्श्वभूमीवर या कायद्यांबाबत भारतीय मजदूर संघाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.

या सेमिनारला राज्यभरातून संरक्षण, वीज मंडळ, बँका, विमा, अनुऊर्जा, पोस्ट , मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, RCF , पोर्ट ट्रस्ट, खाजगी कारखाने, सार्वजनिक उद्योग, सहकारी बँका, शासकीय कर्मचारी, सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस, कंत्राटी कामगार, अंगणवाडी, घरेलू , बांधकाम, रिक्षाचालक, फेरीवाले, टॅक्सीचालक, बिडी, मर्चंट नेव्ही, सुरक्षा रक्षक, एअर इंडिया आदी उद्योगातील 250 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सेमिनारचे उद्घाटन कामगार मंत्री श्री.फुंडकर यांनी केले. ॲड.ढुमणे आणि श्री.शर्मा यांनी या कायद्यांबाबत भारतीय मजदूर संघाची भूमिका विशद केली. या निमित्ताने ॲड.ढुमणे यांनी लिहिलेल्या ” नवीन लेबर कोड आणि बी.एम.एस.’ या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय श्रमशोध मंडळाच्या वतीने कामगारमंत्री श्री.फुंडकर हस्ते करण्यात आले.

अंगणवाडी भरती 2025 लेटेस्ट अपडेट येथे पाहा

🔹 नवीन कामगार कायद्यांसंदर्भात महत्त्वाचे मुद्दे

📌 2019-2020 मध्ये संसदेने नवीन कामगार कायदे मंजूर केले होते.
📌 कामगार संरक्षण आणि वेतन हमी यासंदर्भात मोठे बदल प्रस्तावित.
📌 कामगार कपात, कंत्राटी कामगार धोरण, स्टॅंडिंग ऑर्डरमध्ये सुधारणा करण्याची मागणी.

🛠️ कायद्यांत होणाऱ्या प्रमुख सुधारणा

📍 सामाजिक सुरक्षा कोड 2020 आणि वेतन कोड 2019 (New Labour Code)
50 कोटी असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळणार.
घरेलू, बांधकाम, अंगणवाडी, आशा सेविका, फेरीवाले, रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांना किमान वेतन हमी.

आरोग्य विभाग भरती : नियुक्ती न घेणाऱ्या त्या उमेदवारांची नियुक्ती रद्द!

📍 औद्योगिक संबंध कोड 2020 आणि व्यावसायिक सुरक्षा कोड 2020
फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट, ले-ऑफ धोरणामध्ये सुधारणा.
कारखाना बंद करणे, कामगार कपात यासंबंधी नवीन नियम लागू करण्याची मागणी.
स्टॅंडिंग ऑर्डर आणि कंत्राटी कामगारांच्या धोरणांमध्ये सुधारणा आवश्यक.

सामाजिक सुरक्षा कोड 2020 आणि वेतन कोड 2019 हे कामगार कायदे असंघटित आणि संघटित क्षेत्रातील कामगारांच्या साठी लाभदायक असून घरेलू, बांधकाम, अंगणवाडी, आशा सेविका, फेरीवाले, रिक्षाचालक, टॅक्सीचालक आदी असंघटित क्षेत्रातील सुमारे 50 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि संघटित आणि असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना किमान वेतन हमी देणारे असल्याने ते तत्काळ लागू झाले पाहिजे, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.

त्याचबरोबर औद्योगिक संबंध कोड 2020 आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती कोड 2020 या कोड मधील कारखाना बंद करणे, कामगार कपात, ले ऑफ, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट, स्टॅंडिंग ऑर्डर आणि कंत्राटी कामगारांशी संबंधित अनेक तरतुदी बदलून मगच ते कायदे लागू करावेत, अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्यावतीने यावेळी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण मिलगिर यांनी तर सूत्रसंचालन बाळासाहेब भुजबळ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुंबईचे सचिव संदीप कदम यांनी केले.

आनंदाची बातमी! राज्यातील ‘या’ पदांना नवीन वेतनश्रेणी मंजूर – जाणून घ्या संपूर्ण माहिती

1 thought on “नवीन कामगार कायदे लागू करताना कामगारांचे संरक्षण सर्वोच्च प्राधान्य – कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे प्रतिपादन New Labour Code”

Leave a Comment