राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती, सविस्तर तपशील जाणून घ्या National Health Mission Recruitment

National Health Mission Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) व 15 वा वित्त आयोग अंतर्गत विविध 24 पदांच्या तब्बल 190 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, सदर पदांची अहर्ता पूर्ण असलेल्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

National Health Mission Recruitment

Recruitment under National Health Mission and 15th Finance Commission अंतर्गत District Health Officer, Z.P. Sindhudurg सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अधिनिस्त खालीलप्रमाणे नमुद करणेत आलेली रिक्त पदे 11 महिने 29 दिवस या कालावधीसाठी कंत्राटी पधतीने भरणेकरिता अर्ज मागविणेत येत आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) व 15 वा वित्त आयोग अंतर्गत रिक्त पदाचे नाव

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) व 15 वा वित्त आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकरी , अति विशेतज्ञस्पेशालिस्ट (Super Specialist) , कार्यक्रम व्यवस्थापक , टीबी पर्यवेक्षक , सामाजिक कार्यकर्ता , नर्सिंग प्रशिक्षक , सायकॉलॉजिस्ट , ऑडिओलॉजिस्ट , स्टाफ नर्स (Staff Nurse), ऑप्टोमेट्रिस्ट , समुपदेशक , डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) , फिजिओथेरेपिस्ट , कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी) तसेच निम वैद्यकीय कुष्टरोग कर्मचारी , डायलेसिस तंत्रज्ञ , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , फॅसिलिटी मॅनेजर , आरोग्य सेविका (Staff Nurse) , आरोग्य सेवक , स्टाफ नर्स , पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट इ रिक्त पदांसाठी जाहीरातीमध्ये नमूद शैक्षणिक अहर्ता पूर्ण करत असलेल्या उमेदवारांकडून National Health Mission Recruitment भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक अहर्ता

NHM अंतर्गत विविध 24 संवर्गातील 190 पदांसाठी भरती होत असलेल्या पदनिहाय निश्चित करण्यात आलेली शैक्षणिक अहर्ता नुसार पात्र उमेदवार अर्ज करू शकतात, यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.

इतर जॉब्स : या जिल्ह्यात 245 जागांसाठी मोठी भरती सुरू; जाहिरात PDF, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

आवश्यक वयोमर्यादा

  • वैदयकिय अधिकारी : कमाल वयोमर्यादा 61 वर्षे व सेवा समाप्तीची मर्यादा 70 वर्षे राहिल.
  • स्टाफ नर्स, फिजिओथेरपिस्ट, टिबी पर्यवेक्षक, समाज कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सोशल वर्कर, ऑडिओलॉजिस्ट, पॅरा मेडिकल नेप्रसी वर्कर, समुपदेशक, ऑप्टोमेट्रिस्ट, स्टाफ नर्स व डायलेसिस तंत्रज्ञ या पदांची भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 59 वर्षे व सेवा समाप्तीची मर्यादा 65 वर्षे राहिल. उर्वरीत सर्व पदांचे भरतीसाठी अराखीव प्रवर्गातील उमेदृवारांसाठी वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गातील उमेदृवारांसाठी 43 वर्षे राहिल.

राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM व NAM अंतर्गत पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी वयोमार्यादा शिथिल

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत उमेदृवारांकरिता कमाल सेवा प्रवेश मर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे. 60 वर्षावरील अर्जादारांकरिता जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारिरिक योग्यतेचे प्रमाणपत्रक (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट) अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहिल.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती महत्वाच्या तारखा

National Health Mission Recruitment : उपरोक्त पदांसाठी विहित सामाजिक प्रवर्गातील इच्छूक व पात्र उमेदवारांनी दि. 01 / 01 / 2025 ते दिनांक 10/01/ 2025 या कालावधीतील सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत (सुट्टट्टीचे दिवस वगळून) जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्यावर अर्ज सादर करावेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती अर्ज कोठे करावा?

संकेतस्थळावरील जाहिरातीत नमुद केलेल्या कागदपत्रासह व संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना सुचित केल्याप्रमाणे सुस्पष्ट भरलेले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी मु.पो ओरोस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM, SINDHUDURG) व पदाचे नावाचा स्पष्ट उल्लेख करुन अर्ज सादर करावेत. तसेच पोष्टाने प्राप्त होणारे अर्ज विहित कालावधीत प्राप्त होतील याची उमेदृवाराने दखल घ्यावी.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती मूळ जाहिरात व अर्जाचा नमूना

नोट : मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावेत, यासाठी https://sindhudurg.nic.in/en/notice_category/recruitment/ या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.

अर्जाचा नमूना व मूळ जाहिरात येथे पाहा

स्टेट बँक ऑफ इंडियात 13735 रिक्त पदांची मोठी भरती

Leave a Comment