Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Launch : सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे दि 2 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरणाच्या विविध योजनांचे लाभ महिलांना प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. जिल्ह्यात दोन लाख महिलांना लाभ मंजूर झाल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर
महिलांच्या सक्षमीकरणामुळेच देश महासत्ता होईल. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारी कायमस्वरुपी योजना असून सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर आहे. राज्यातील महिलांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे सरकारचे ध्येय्य आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सशक्तीकरण मेळाव्यात उपस्थित बहिणींना आश्वस्त केले. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Launch)
खुशखबर! ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी नवीन वेबसाइट सुरू! येथे क्लिक करा
वर्षाला 18 हजार रुपये एका बहिणीला मिळणार
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Majhi Ladki Bahin Yojana) योजने’तून महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला 18 हजार रुपये एका बहिणीला मिळतील. बहिणींना आता फक्त रक्षाबंधन किंवा भाऊबिजेलाच ओवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा माहेरचा आहेर देणारी ही योजना कायमस्वरूपी आहे, अशा शब्दात त्यांनी उपस्थित महिलांना आश्वस्त केले.
लाडकी बहिण योजनेचे 3 मोठे अपडेट येथे पाहा
वर्षभरात दोन कोटींहून अधिक भगिनींना लाभ
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, ,लाडकी लेक योजना, मुलींचे उच्च शिक्षणही मोफत करणे, एस.टी. प्रवासात 50 टक्के सवलत, महिला सशक्तीकरण अभियन अशा विविध योजनांमधून एका वर्षांत दोन कोटींपेक्षा जास्त माता भगिनींना याचा लाभ झाला असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
लाडकी बहिण योजनेची यादी जाहीर, ऑफलाईन आणि ऑनलाईन यादी पाहा
फक्त बहिणींसाठी नव्हे तर लाडक्या भावांसाठी सुध्दा योजना
फक्त बहिणींसाठी नव्हे तर लाडक्या भावांसाठीसुध्दा मुख्यमंत्री युवा अप्रेंटिंसशीप योजना आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला प्रत्येक गावातून, प्रत्येक शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय.
लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात 45 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अन्य कल्याणकारी योजनांसाठी जवळपास एक लाख कोटी रुपयांची तजवीज केली आहे. जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी अटी कमी केल्यात. राज्यातील महिलांच्या चेहऱ्यावर या योजनेमुळे आनंद निर्माण झालाय हे सत्य आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दोन लाख अर्ज मंजूर झाले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी बहिणींचे अभिनंदनही केले.
योजनेचे देशपातळीवर कौतुक
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी इतके दिवस म्हणायचो की मला एक बहीण आहे; पण मुख्यमंत्री झाल्यापासून तुमच्या रूपाने राज्यातल्या लाखो बहिणी मला मिळाल्या, हे माझं भाग्य आहे.
मी जिथे जातोय तिथे बहिणी राखी बांधायला येतात. इतकं नशीबवान भाऊपण मिळायला भाग्य लागतं. तुमच्या या भावाची जबाबदारीपण आता वाढली आहे. या योजनेमुळे देशपातळीवरही राज्याचे कौतुक झाले आहे.
खुशखबर! ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी नवीन वेबसाइट सुरू! येथे क्लिक करा
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Launch : या भव्य सोहळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया तसेच तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
NHM कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात पाहा लेटेस्ट अपडेट