लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळवायचे आहेत ना ? मग आताच पूर्ण करा ‘हे’ महत्वाचे काम

Mukhyamantri Annapurna Yojana : राज्यातील गरीब कुटुंबांतील महिलांना वार्षिक 3 गॅस सिलिंडर (Free Gas Cylinder) पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन महत्वाचे काम पूर्ण करावे लागणार आहे.

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलिंडर मोफत

गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा, तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी LPG गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे. परंतू गॅस जोडणीधारकांना बाजारदराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात.

त्याअनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (Mukhyamantri Annapurna Yojana) जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील प्रधाममंत्री उज्ज्वला योजना आणि ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे.

अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाची अपडेट! ‘पोषण ट्रॅकर ऍप’ मुळे काम झाले सोपे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची यादी जाहीर, ऑफलाईन आणि ऑनलाईन यादी पाहा

वार्षिक मोफत गॅस योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ महत्वाचे दोन काम पूर्ण करा

  1. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई- केवायसी (e-KYC) करावे.
  2. तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार सलग्न करून घ्यावे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी : आवश्यक पात्रता शासन निर्णय येथे पाहा

अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाची अपडेट!

राज्यातील ‘या’ महिलांसाठी मोठी भेट! दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर! आवश्यक पात्रता पाहा

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now