Mukhya Mantri Majhi Ladki Bahin Yojana
राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhya Mantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू करण्यात आली असून, या योजनेतून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नाव नोंदणी लवकरच सुरु होणार आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांनी अर्जाची नावनोंदणी करण्यासाठी राज्य शासनासह स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य शासनामार्फत पोर्टल वरील अपडेट नुसार दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र या रकमेत नवीन सरकार वाढ करणार का? हे पहावे लागणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक – शासन निर्णय
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या महिला पात्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ‘या’ तारखेपासून
अर्ज करण्याची प्रक्रिया
योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल अँपद्वारे, सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. तसेच ऑफलाईन अर्जाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा आता अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी), ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
योजनेसाठी भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी), सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी त्याची पोच पावती दिली जाणार आहे.
या योजनेसाठी अर्ज विनामूल्य भरून देण्यात येत आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. अर्जदार महिलेने स्वतःवरील सुचविलेल्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असून, तिचे थेट छायाचित्र काढता येते. त्यामुळे ई-केवायसी करणे सोईचे आणि सुलभ होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/
NMMS Hall Ticket : mscepune in Download Link Here
Jawahar Navodaya Vidyalaya Admit Card 2025-26 : Download Direct Link
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…