MPSC Age Limit : शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या (MPSC Exam) परीक्षांसंदर्भात कमाल वयोमर्यादेत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
MPSC Schedule : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ च्या नियोजित वेळापत्रकापेक्षा साधारणतः ९ ते १० महिने विलंब झाला असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे राज्यातील अनेक उमेदवारांनी शासन सेवेतील प्रवेशाकरिताची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असल्याने असे उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरत आहेत. यानुषंगाने कमाल वयोमर्यादेत शिथीलता देण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात निवेदने शासनास प्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर अशा प्रकरणी कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
MPSC 2025 वर्षातील वेळापत्रक येथे पाहा
तंत्रज्ञ (Technician) -३ पदाची मोठी सरळसेवा भरती, जाहिरात पाहा
13735 रिक्त पदांची मोठी भरती, जाहिरात ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
दिनांक ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरांतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथीलता देण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर – येथे पाहा
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ अन्वये राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप संपूर्ण यादी
सदर अधिनियमातील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पदसंख्या व आरक्षण नमूद करुन मागणीपत्रे सुधारित करण्याची कार्यवाही आवश्यक आहे.
याकरिता सुधारित मागणीपत्रानुसार जाहिराती प्रसिद्ध करण्यास नियोजित वेळापत्रकापेक्षा विलंब झाला असल्याने सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची येथे पाहा
केंद्र सरकारकडून महिलांसाठी खास योजना, 7 हजार रुपये महिना – सविस्तर येथे पाहा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे विविध संवर्गाचा निकाल जाहीर