MPSC Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून चार महत्वाचे अपडेट देण्यात आले असून, सविस्तर पाहूया.
1) उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) – गट ब – (अराजपत्रित) पदाचा निकाल जाहीर
उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) गट- ब (अराजपत्रित) या संवर्गाच्या मुलाखती दिनांक २७ सप्टेंबर, १६ व १७ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या पदाचा निकाल महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.
राज्यातील 288 मंतदारसंघाचा निकाल, अधिकृत वेबसाईटवर येथे पाहा
2) वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग- गट-अ मधील संवर्गाचा निकाल जाहीर
वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, गट-अ मधील सह्योगी प्राध्यापक संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आले आहे. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र (Biochemistry), शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, गट-अ;
सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ, सातारा;
सहयोगी प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र (Orthopedics), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ.आणि
सहयोगी प्राध्यापक, शरिररचनाशास्त्र (Anatomy), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ, परभणी. या संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून 10 वी आणि 12 वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पाहा नवीन वेळापत्रक
3) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या विविध संवर्गांच्या पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूर कार्यालयात या मुलाखती घेण्यात येतील. अधिक महितीसाठी https://mpsc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
या विभागात विविध पदांसाठी मोठी भरती सुरू, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
4) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ व दिव्यांग उमेदवार हे लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी त्यांना लेखनिक उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर ‘दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना’ प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित सर्व कागदपत्रांसह संदर्भीय शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार विनंती अर्ज सादर करुन पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे. अधिक महितीसाठी https://mpsc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
या विभागात विविध पदांसाठी मोठी भरती सुरू, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक