मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची यादी जाहीर, ऑफलाईन आणि ऑनलाईन यादी पाहा

Majhi Ladki Bahin Yojana List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या याद्या आता जाहीर करण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून जवळपास 1 कोटी 30 लाख 29 हजार 980 अर्ज संबंधित विभागाकडे प्राप्त झाले होते. लाडकी बहिण योजनेची यादी तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने पाहू शकणार आहात, त्यासाठी हे आर्टिकल सविस्तर वाचा.

लाडकी बहिण योजना यादी ऑफलाईन येथे पाहा

  1. लाडकी बहिण योजना यादी ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येणार आहे.
  2. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध केली जाणार आहे. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास किंवा काही त्रुटी असल्यास निराकारण करण्यात येणार आहे.
  3. दुरुस्ती आणि डुप्लिकेशनचे फॉर्म आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी टाळले जाणार आहे.
  4. अर्जदार महिला पात्र झाली असेल तर अंतिम पात्र लाभार्थ्याची यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीमध्ये पाहू शकता
  5. त्रुटी मध्ये फॉर्म पडला असेल तर तो सुद्धा त्या ठिकाणी दुरुस्त केला जाणार आहे.
  6. त्यामुळे Majhi Ladki Bahin Yojana List या योजनेची ऑफलाईन यादी तुम्ही तुमच्या जवळील ग्रामपंचायत/नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचयात स्तरावर पाहू शकता.

लाडकी बहीण योजनेच्या या महिलांच्या खात्यात पैसे जमा – पाहा अपडेट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहिण योजना यादी ऑनलाईन येथे पाहा

लाडकी बहिण योजनेची ऑनलाईन यादी पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, त्यानंतर लाभार्थी यादी वर क्लिक करून तुमचा जिल्हा, तालुका निवडून आवश्यक माहिती सिलेक्ट करून यादीत नाव पाहता येईल.

किंवा अर्जदार लॉगिन करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता. याव्यतिरिक्त दूसरा पर्याय खाली दिलेला आहे.

  1. तुम्ही जर Nari Shakti Doot App वरुन ऑनलाईन अर्ज केला असेल तर नारी शक्ती दूत नावाचे ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.
  2. सुरुवातीला हे ॲप तुम्हाला अपडेट करून घ्यावे लागेल, त्यानंतर या ॲपमध्ये मी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
  3. जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या अर्जापुढे Approved असे लिहून येईल. किंवा तुमचा अर्ज Pending मध्ये देखील असू शकतो.
  4. जर तुमचा अर्ज Pending मध्ये असेल तर तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे.
  5. परंतु जर तुमचा अर्ज Disapproved झाला तर मात्र तुम्हाला अर्ज पुन्हा भरावा लागेल.

दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर! आवश्यक पात्रता पाहा

तसेच तुमच्या प्रशासनाच्या जिल्हा/महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन यादी चेक करू शकता. (उदा. धुळे मनपा जिल्ह्याची यादी येथे पाहा)

अधिक माहितीसाठी आणि संपर्कासाठी – ग्राम (शहरी) स्तरीय समितीमधील (ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, रोजगार सेवक, अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी) यांच्याशी संपर्क साधा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

लाडकी बहीण योजनेचा लाभ अपडेट येथे पाहा

Leave a Comment