Majhi Ladki Bahin New Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात महत्वाचे नवीन अपडेट देण्यात आले आहे, लोकप्रिय ठरलेल्या या योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात आली असून, रक्षाबंधन पूर्वी राज्यातील पात्र लाभयार्थ्याच्या खात्यात दोन महिन्याचा एकूण 3000 रुपये लाभ थेट खात्यात जमा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.
कुटुंबातील दोन भगिनींना योजनेचा लाभ घेता येणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) प्रत्येक कुटुंबातील दोन भगिनींना योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. तसेच ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत आता दिनांक 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. या संधीचा लाभ उठवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या याद्या जाहीर, येथे पाहा ऑनलाईन ऑफलाईन यादी
ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचणी येतीय का? तर मग आता चिंता करू नका ‘येथे’ सादर करा अर्ज
#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजनेचा अर्ज जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी येत असतील तर चिंता करू नका. आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत, वॉर्ड तसेच सेतू सुविधा केंद्रात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करा. असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे.
खुशखबर! ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी नवीन वेबसाइट सुरू! येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेच्या या महिलांच्या खात्यात पैसे जमा – पाहा अपडेट
लाडकी बहीण योजनेच्या व्हायरल झालेल्या परिपत्रकाबद्दल सरकारचे स्पष्टीकरण
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या परिपत्रकात मराठी भाषेमधील अर्ज रद्द करण्याची चुकीची बाब नमूद केली आहे. या संदर्भात तहसीलदार, जिल्हाधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून अशा कोणत्याही अटी मुळे अर्ज रद्द करणार नसल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.