Majhi Ladki Bahin GR : “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अंमलबजावणीबाबत लाभार्थी यादी मंजूरी संदर्भात महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालीलप्रमाणे दि. 7 ऑगस्ट 2024 रोजीच्या मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय येथे पाहा
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ज्या जिल्हयात विधानसभा क्षेत्र निहाय समिती गठीत झाली नसल्यास तसेच विधानसभा क्षेत्र समितीकडून पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम झाली नसल्यास जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची यादी पुढील कार्यवाहीस्तव शासनास पाठविण्यात येणार आहे.
येथे पाहता येणार लाडकी बहिण योजनेची ऑफलाईन आणि ऑनलाईन यादी
तसेच जिल्हाधिकारी यांनी यथावकाश विधानसभा क्षेत्र समितीची मान्यता घ्यावी. जर समितीची मान्यता होण्यास अडचण असल्यास संबंधित जिल्हयांचे पालकमंत्री यांची मान्यता घेण्यात यावी. अशा सूचना शासन निर्णयामध्ये देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा
सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर? समन्वय समितीच्या बैठकीत नेमके काय ठरले?
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ संदर्भात ‘तीन’ महत्वाचे अपडेट
खुप छान होईल अशी अपेक्षा आहे