Maharashtra Arogya Yojana
Maharashtra Arogya Yojana : शासन सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत असून, ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या तत्त्वावर चालणारे आहे. लोकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाणे येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ६ डे-केअर किमोथेरपी सेंटर (ठाणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि वर्धा) उभारण्याची घोषणा करण्यात आली. तसेच, ८ कर्करोग मोबाईल व्हॅन, ३८४ रुग्णवाहिका, २ सीटी स्कॅन यंत्रणा, ७ अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका आणि ८० डिजिटल एक्स-रे मशिन यांचे लोकार्पणही करण्यात आले.
या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक उपक्रम – 2 कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, शासनाने “जिथे एसटी डेपो, तिथे कॅशलेस हॉस्पिटल“ ही संकल्पना संपूर्ण राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत सरकारने मोफत आरोग्य तपासणी मोबाईल व्हॅन सुरू केली आहे. ही व्हॅन गावोगावी जाऊन महिलांच्या आरोग्याची तपासणी करणार आहे.
कर्मचाऱ्यांसाठी हे ‘रोल मॉडेल’ संपूर्ण राज्यभर राबविणार
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आधी दीड लाखांपर्यंत मदत केली जात होती. परंतु आता ही मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आरोग्य योजनेत 1356 आजारांवर विनामूल्य उपचार! तुमच्या जिल्ह्यातील हॉस्पिटल लिस्ट पाहा
शिंदे यांनी सांगितले की, त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात त्यांनी ४६० कोटी रुपयांची मदत गरजू रुग्णांसाठी दिली. आता सरकारने “उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष” सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याद्वारे गरजू रुग्णांना मदत मिळणार आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, राज्यातील दोन कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामध्ये रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, तसेच इतर आवश्यक तपासण्या मोफत केल्या जातील. हा उपक्रम संपूर्ण राज्यातील महिलांसाठी समर्पित आहे.
लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नवीन अपडेट येथे पाहा
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी “हर घर आयुर्वेद” या उपक्रमाचा शुभारंभ केला. यामुळे आयुर्वेदाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार आहे.
सुदृढ मानसिक आरोग्यासाठी “मायका” नावाच्या समुपदेशन अॅपचे लोकार्पण करण्यात आले. हे अॅप सर्व वयोगटातील नागरिकांसाठी उपयुक्त आहे आणि गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, शासनाने कॅन्सर, टीबी, हृदयरोग यांसारख्या आजारांचे लवकर निदान आणि उपचार करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आरोग्य तपासणी उपक्रमाचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कर्करोग तज्ञ, क्षयरोग नियंत्रणासाठी कार्य करणारे डॉक्टर, तसेच दंतचिकित्सक तज्ञांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय, “टीबी मुक्त भारत” अभियानांतर्गत निक्षय मित्र फूड बास्केटचे वितरणही करण्यात आले.
या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…