Mahahsc 10th 12th Updates
Mahahsc 10th 12th Updates : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी कठोर सुरक्षा उपाय राबवले जाणार आहेत. कॉपी प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्यभर ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवण्याचे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत.
📌 12वी परीक्षा – 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025
📌 10वी परीक्षा – 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी परीक्षा भयमुक्त, निकोप आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी शालेय शिक्षण विभाग व शिक्षण मंडळाला विशेष निर्देश दिले आहेत.
आरोग्य विभागातील 2000 रिक्त पदे भरली जाणार!
✅ ड्रोन आणि सीसीटीव्ही निगराणी – संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेराद्वारे देखरेख केली जाईल.
✅ वीडिओ चित्रीकरण – परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनाकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येईल.
✅ भरारी पथके आणि बैठी पथके – प्रत्येक परीक्षा केंद्रावर अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांची नेमणूक केली जाईल.
✅ फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान – परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांची ओळख पटवली जाईल.
✅ प्रत्येक परीक्षार्थीला अधिकृत ओळखपत्र बंधनकारक – परीक्षेशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना अधिकृत ओळखपत्र दिले जाणार.
✅ झेरॉक्स सेंटर बंद – परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार.
✅ कलम 144 लागू – परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येईल, त्यामुळे चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव असेल.
✅ गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई – महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टीसेस ॲक्ट 1982 च्या अंतर्गत गैरप्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्या किंवा मदत करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जातील.
राज्यातील ‘या’ पदांना नवीन वेतनश्रेणी मंजूर – जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मंडळामार्फत करण्यात येणाऱ्या या उपाययोजनांची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व परीक्षेशी संबंधित सर्व घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाच्या सचिव डॉ.माधुरी सावरकर यांनी केले आहे.
अधिक अपडेटसाठी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या! ✅
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…