महाराष्ट्र बोर्ड परीक्षा अपडेट: परीक्षेसाठी नवीन नियम लागू, जाणून घ्या संपूर्ण माहिती Mahahsc 10th 12th Updates

Mahahsc 10th 12th Updates : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी कठोर सुरक्षा उपाय राबवले जाणार आहेत. कॉपी प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्यभर ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवण्याचे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत.

परीक्षा वेळापत्रक:

📌 12वी परीक्षा11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025
📌 10वी परीक्षा21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी परीक्षा भयमुक्त, निकोप आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी शालेय शिक्षण विभाग व शिक्षण मंडळाला विशेष निर्देश दिले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरोग्य विभागातील 2000 रिक्त पदे भरली जाणार!

कॉपीमुक्त परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या प्रमुख उपाययोजना:

ड्रोन आणि सीसीटीव्ही निगराणी – संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेराद्वारे देखरेख केली जाईल.
वीडिओ चित्रीकरण – परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनाकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येईल.
भरारी पथके आणि बैठी पथके – प्रत्येक परीक्षा केंद्रावर अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांची नेमणूक केली जाईल.
फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान – परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांची ओळख पटवली जाईल.
प्रत्येक परीक्षार्थीला अधिकृत ओळखपत्र बंधनकारक – परीक्षेशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना अधिकृत ओळखपत्र दिले जाणार.
झेरॉक्स सेंटर बंद – परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार.
कलम 144 लागू – परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येईल, त्यामुळे चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव असेल.
गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईमहाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टीसेस ॲक्ट 1982 च्या अंतर्गत गैरप्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्या किंवा मदत करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जातील.

राज्यातील ‘या’ पदांना नवीन वेतनश्रेणी मंजूर – जाणून घ्या संपूर्ण माहिती!

विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी घेतली पाहिजे नोंद!

मंडळामार्फत करण्यात येणाऱ्या या उपाययोजनांची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व परीक्षेशी संबंधित सर्व घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाच्या सचिव डॉ.माधुरी सावरकर यांनी केले आहे.

अधिक अपडेटसाठी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या!

सुवर्णसंधी! स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका बक्षीसे!

Leave a Comment