मोठी अपडेट! MahaTET परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर! Maha TET Final Result Direct Link

Maha TET Final Result Direct Link : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ पेपर I (इ. १ ली ते ५ वी) पेपर II (इ. ६ वी ते ८ वी) चा अंतरिम निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर I आणि पेपर II चा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे, ते आपला निकाल 31 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4:00 वाजल्यापासून https://mahatet.in/ या संकेतस्थळावर पाहू शकतात.

महत्वाच्या तारखा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • निकाल पाहण्याची तारीख: 31 जानेवारी 2025 (सायंकाळी 4:00 वाजल्यापासून)
  • गुणपडताळणी/आक्षेप नोंदवण्याची तारीख: 1 फेब्रुवारी 2025 ते 6 फेब्रुवारी 2025
  • राखीव निकालासाठी निवेदन पाठवण्याची अंतिम तारीख: 6 फेब्रुवारी 2025

Maha TET Final Result Direct Link

अधिक माहितीसाठी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटला भेट द्या किंवा https://mahatet.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

Maha TET Final Answer Key

Maha TET Final Result Direct Link

पेपर। व पेपर II साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक ३१.०१.२०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटि/आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर दिनांक ०१.०२.२०२५ ते दिनांक ०६.०२.२०२५ पर्यंत उमेदवारांच्या लॉगीन मधुन ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी नवीन नियम लागू!

दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट! गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक ०६.०२.२०२५ पर्यंत mahatet24.msce@gmail.com या इमेल वर पाठवावे. दिनांक ०६.०२.२०२५ नंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

Leave a Comment