Local Holiday List 2025 : सामान्य प्रशासन विभागाने दिनांक १८ डिसेंबर रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे.
शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर
Government Circular : शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सार्वसु-११९६/प्र.क्र.५/९६/२९. दिनांक १८ सप्टेंबर, १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी “अनंत चतुर्दशी या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येते.
त्यानुसार सन २०२५ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयांना खालील दिवशी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे.
- दिनांक १६ ऑगस्ट, २०२५ (शनिवार) : गोपाळकाला (दहिहंडी) Gopalkala (Dahihandi)
- दिनांक ०६ सप्टेंबर, २०२५ (शनिवार) : अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi)
हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना लागू असणार आहे.
सदर स्थानिक सट्टी शासन निर्णय क्रमांक पी अॅन्ड एस. नंबर पी-१३/11/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात आली आहे.
सार्वजनिक सुट्ट्यांची यादी 2025 येथे पाहा
सार्वजनिक सुट्ट्यांची यादी 2025 | Public Holidays 2025
महाराष्ट्र राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेनुसार 2025 या वर्षात तब्बल 24 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत, तसेच एक सुट्टी ही बँकाना देण्यात आली आहे. सार्वजनिक सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे
आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या कार्यावर आधारित शॉर्ट फिल्म पाहा
लाडकी बहीण योजनेचे सुधारित निकष अपडेट येथे पाहा
13735 रिक्त पदांची मोठी भरती, जाहिरात ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक