LIC Bima Sakhi Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)) यांनी सोमवार दिनांक 11 डिसेंबर रोजी हरियाणामधून विमा सखी योजना सुरू केली आहे. LIC च्या विमा सखी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट हे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणे आहे. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Life Insurance Corporation (LIC) ची ही योजना 18 ते 70 वर्षे वयोगटातील महिलांसाठी आहे, ज्या महिला 10 वी उत्तीर्ण आहेत. त्यांना पहिली तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांची आर्थिक समज वाढवून त्यांना विम्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.
या प्रशिक्षण कालावधीत महिलांना विद्यावेतन देखील मिळणार आहे, प्रशिक्षणानंतर महिला एलआयसी विमा एजंट म्हणून काम करू शकतील. त्याचबरोबर बीए पास विमा सखींनाही विकास अधिकारी होण्याची संधी मिळू शकणार आहे.
LIC Bima Sakhi या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना ‘विमा सखी’ असे संबोधण्यात येणार आहे. याचे काम हे महिलांना विमा काढण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना या कामात मदत करणे असे असणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या निकषांसंदर्भात; अधिकृत माहिती येथे पहा
विमा सखी योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना तीन वर्षांच्या प्रशिक्षणादरम्यान एकूण 2 लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळणार आहे. यामध्ये पहिल्या वर्षी 7 हजार रुपये दरमहा, दुसऱ्या वर्षी 6 हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5 हजार रुपये मिळतील.
यामध्ये बोनस कमिशनचा समावेश नाही. यासाठी अट अशी असेल की महिलांना विकल्या जाणाऱ्या पॉलिसींपैकी ६५ टक्के पॉलिसी पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत सक्रिय (अंमलात) राहाव्यात.
याचा अर्थ असा की जर एखाद्या महिलेने पहिल्या वर्षात 100 पॉलिसी विकल्या असतील तर त्यापैकी 65 पॉलिसी दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस लागू राहतील. एजंट केवळ पॉलिसी विकत नाहीत तर त्या टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात याची खात्री करणे हा त्याचा उद्देश आहे.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट!
NUHM भरती जाहिरात, अर्ज येथे करा
अधिक माहितीसाठी : येथे क्लिक करा
ग्रामीण डाक सेवक भरती, 1154 उमेदवारांची निवड, यादीत नाव पाहा
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…