LIC Bima Sakhi Yojana : LIC ची ‘विमा सखी’ योजना प्रत्येक महिन्याला 7000 रुपये मिळणार, सविस्तर जाणून घ्या.

LIC Bima Sakhi Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)) यांनी सोमवार दिनांक 11 डिसेंबर रोजी हरियाणामधून विमा सखी योजना सुरू केली आहे. LIC च्या विमा सखी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट हे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणे आहे. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

विमा सखी योजना काय आहे ? | What Is Bima Sakhi Yojana

Life Insurance Corporation (LIC) ची ही योजना 18 ते 70 वर्षे वयोगटातील महिलांसाठी आहे, ज्या महिला 10 वी उत्तीर्ण आहेत. त्यांना पहिली तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांची आर्थिक समज वाढवून त्यांना विम्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.

या प्रशिक्षण कालावधीत महिलांना विद्यावेतन देखील मिळणार आहे, प्रशिक्षणानंतर महिला एलआयसी विमा एजंट म्हणून काम करू शकतील. त्याचबरोबर बीए पास विमा सखींनाही विकास अधिकारी होण्याची संधी मिळू शकणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Bima Sakhi या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना ‘विमा सखी’ असे संबोधण्यात येणार आहे. याचे काम हे महिलांना विमा काढण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना या कामात मदत करणे असे असणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या निकषांसंदर्भात; अधिकृत माहिती येथे पहा

विमा सखी योजनेसाठी आवश्यक पात्रता | Lic Bima Sakhi Yojana Eligibility

  1. विमा सखी योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात.
  2. त्यांच्याकडे मॅट्रिक/हायस्कूल/10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.
  3. या योजनेसाठी केवळ 18 ते 70 वयोगटातील महिलाच अर्ज करू शकतील.
  4. तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर महिला विमा एजंट म्हणून काम करतील.

विमा सखीला किती पैसे मिळतील?

विमा सखी योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना तीन वर्षांच्या प्रशिक्षणादरम्यान एकूण 2 लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळणार आहे. यामध्ये पहिल्या वर्षी 7 हजार रुपये दरमहा, दुसऱ्या वर्षी 6 हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5 हजार रुपये मिळतील.

यामध्ये बोनस कमिशनचा समावेश नाही. यासाठी अट अशी असेल की महिलांना विकल्या जाणाऱ्या पॉलिसींपैकी ६५ टक्के पॉलिसी पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत सक्रिय (अंमलात) राहाव्यात.

याचा अर्थ असा की जर एखाद्या महिलेने पहिल्या वर्षात 100 पॉलिसी विकल्या असतील तर त्यापैकी 65 पॉलिसी दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस लागू राहतील. एजंट केवळ पॉलिसी विकत नाहीत तर त्या टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात याची खात्री करणे हा त्याचा उद्देश आहे.

लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट!

NUHM भरती जाहिरात, अर्ज येथे करा

विमा सखीसाठी अर्ज कसा करावा? | Lic Bima Sakhi Yojana Apply Online

  1. सर्वप्रथम LIC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://licindia.in/test2
  2. तिथे Click Here For Bima sakhi विमा सखीसाठी येथे क्लिक करा.
  3. त्यानंतर आवश्यक माहिती जसे – नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पत्ता यासारखे तपशील भरा.
  4. तुम्ही एलआयसी इंडियाच्या कोणत्याही एजंट/विकास अधिकारी/कर्मचारी/वैद्यकीय परीक्षकाशी संबंधित असाल, तर तीच माहिती द्या.
  5. शेवटी कॅप्चा कोड भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी : येथे क्लिक करा

ग्रामीण डाक सेवक भरती, 1154 उमेदवारांची निवड, यादीत नाव पाहा

मोफत टॅब योजनेची निवड यादी पाहा

Leave a Comment