महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25 साठी आर्थिक मदतीच्या निधीचे वितरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला असून, पात्र लाभार्थींना निधी वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
योजना कोणासाठी आहे?
माझी कन्या भाग्यश्री योजना ही मुलींच्या सशक्तीकरणासाठीची राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि संपूर्ण विकासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
- लेक लाडकी योजनेत रूपांतर: माझी कन्या भाग्यश्री योजना आता ‘लेक लाडकी‘ योजनेत रूपांतरित झाली आहे, परंतु ३१ मार्च २०२३ पर्यंतच्या लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे.
- कोणाला मिळणार लाभ: ज्या लाभार्थ्यांचे अर्ज ३१ मार्च २०२३ पर्यंत सादर केले आहेत, त्यांना या निधीतून लाभ मिळेल.
लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती, किती मिळणार लाभ?
Lek Ladki scheme : लेक लाडकी या योजनेत पिवळ्या व केशरी रेशनधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल. राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
लाडकी बहीण योजना नवीन अपडेट पाहा
महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजनेतील लाभार्थ्यांसाठी ८.८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे!
अधिक माहितीसाठी: शासन निर्णय येथे पाहा
माझी लाडकी बहीण योजनेतून या लाभार्थ्यांना वगळले; या ‘निकषात’ बसणाऱ्या महिला योजनेतून बाहेर
अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची भरती! आवश्यक पात्रता व इतर माहिती पाहा
लेक लाडकी योजनेचा शासन निर्णय व अर्ज नमुना Lek Ladki Yojana Form
लेक लाडकी योजनेसाठी अर्जाचा नमुना व सविस्तर तपशील अधिकृत शासन निर्णयात पहा – डाउनलोड करा
महिला व बाल विकास विभाग: https://icds.gov.in/