Laghulekhak New Pay Scale : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स, मुंबई संस्थेतील लघुलेखक (निम्नश्रेणी) संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी शासनाने वेतनश्रेणी सुधारित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या अहवालाच्या शिफारशीनुसार लघुलेखकांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
नवीन वेतनश्रेणी:
पूर्वीची वेतनश्रेणी एस-१४ (₹38,600 – ₹1,22,800) ऐवजी आता एस-१५ (₹41,800 – ₹1,32,300) लागू करण्यात आली आहे.
महत्त्वाचे मुद्दे
✅ शासन निर्णय 3 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित.
✅ 01 फेब्रुवारी 2023 पासून प्रत्यक्ष लाभ लागू.
✅ 01 जानेवारी 2016 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीतील थकबाकी अनुज्ञेय नाही.
✅ “लघुलेखक (निम्नश्रेणी)” हे नवे पदनाम अधिकृत करण्यात आले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गट विमा योजनेचे नवीन दर येथे पाहा
शासन निर्णयानुसार
🔹 संबंधित संस्थांना कार्यालयीन अभिलेखांमध्ये आवश्यक दुरुस्ती करणे बंधनकारक.
🔹 कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन नियुक्ती / पदोन्नतीच्या दिनांकापासून काल्पनिकरित्या मंजूर.
🔹 वित्त विभागाच्या संमतीनंतर हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
तुम्हाला किती इन्कम टॅक्स भरावा लागणार – येथे चेक करा
सुधारित वेतनश्रेणी मंजूर
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स, मुंबई संस्थेतील लघुलेखक (निम्नश्रेणी) संवर्गातील पदांना राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे लघुलेखक पदावरील कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार असून, त्यांच्या सेवेशी संबंधित प्रोत्साहन वाढणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील सर्व निर्णय येथे पाहा
अधिक माहितीसाठी: [शासन निर्णयाची लिंक]
सेवक योजना लागू न करता थेट नियमित वेतनश्रेणीत नियुक्ती देण्याबाबत – शासन निर्णय