खुशखबर! ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी नवीन वेबसाइट सुरू! आता अर्ज काही मिनिटांत अपलोड होणार

LadkiBahin New Website Portal : महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरत असून, या योजनेस राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे, या योजनेच्या पात्र लाभार्थी यांना डिसेंबर 2024 पर्यंतचे पैसे थेट बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. आता लवकरच नवीन अर्ज करता येणार आहे. आता या योजनेच्या प्रभावी अंबलबाजवणीसाठी मागील सरकारने नवीन वेबसाईट (ladakibahin.maharashtra.gov.in) सुरू केली आहे. तेथून आता ‘लाडकी बहीण’ योजनेचा अर्ज भरता येणार आहे. (डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यास दिनांक 28 जून 2024 रोजी मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी – आवश्यक पात्रता

  1. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  2. किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  3. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  4. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
  5. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी – आवश्यक कागदपत्रे

Ladki Bahin Yojana Documents : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदारांना राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे), लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो इ. कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यापूर्वीच्या निकषानुसार वरील कागदपत्रे आवश्यक होती, मात्र अद्यापपर्यंत या योजनेचे अर्ज सुरू झाले नसून लवकरच याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येणार आहे. त्यामुळे कागदपत्रात बदल होऊ शकतो. यासाठी अधिकृत वेबसाईट http://ladakibahin.maharashtra.gov.in/ ला भेट द्या.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कोठे करावा? | Ladki Bahin New Website (maharashtra.gov.in)

LadkiBahin New Website Portal : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन सुरू करण्यात आलेल्या पोर्टल वरुन ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा. (अर्ज करण्यापूर्वी योजनेची माहिती काळजीपूर्वक वाचा)

  1. स्टेप 1 – सर्वप्रथम ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत (LadkiBahin New Website Portal) वेबसाईट/पोर्टल वर जा.
  2. स्टेप 2 -तिथे अर्जदार लॉगिनयावर क्लिक करा
  3. स्टेप 3 -आता Create Account वर क्लिक करा
  4. स्टेप 4 -त्यानंतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
  5. स्टेप 5 -त्यानंतर तुम्ही पुन्हा अर्जदार लॉगिन वर क्लिक करून तयार केलेला पासवर्ड टाका आणि लॉगिन करा.
  6. स्टेप 6 -आता तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती दिसेल ती काळजीपूर्वक वाचूनच नंतर Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana यावर क्लिक करून आवश्यक माहिती भरा.
  • ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
  • तसेच नारी शक्ती दूत (Nari Shakti Doot App) वरून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • नुकीतच सरकारने या योजनेसाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in ही नवीन वेबसाईट सुरू केली असून, येथे देखील तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता.
  • महत्वाचे: अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण LadkiBahin New Website Portal : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

लाडकी बहिण योजनेसाठी नाव कसे तपासावे?

लाडकी बहिण योजनेची यादी जाहीर, ऑफलाईन आणि ऑनलाईन यादी पाहा

दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर! आवश्यक पात्रता पाहा

2 thoughts on “खुशखबर! ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी नवीन वेबसाइट सुरू! आता अर्ज काही मिनिटांत अपलोड होणार”

Leave a Comment